Arjun Tendulkar : 'अर्जुनची बॅटिंग सचिनसारखी, बॉलिंग सोड अन्...', कुणी दिला क्रिकेटच्या देवाच्या मुलाला सल्ला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yograj Singh on Arjun Tendulkar : माजी क्रिकेटपटूच्या वडिलांनी अर्जुन तेंडूलकरच्या भविष्याबद्दल एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हा माजी खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून युवराज सिंग आहे. योगराज सिंग यांनी अर्जुनला मोलाचा सल्ला दिलाय.
advertisement
1/7

अर्जुन तेंडुलकर सध्या गोव्याकडून खेळत असून, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील खराब कामगिरीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो झगडताना दिसत आहे.
advertisement
2/7
बॉलिंग ऑलराउंडर म्हणून ओळख असलेल्या अर्जुनला आयपीएल 2026 साठी लखनऊ सुपर जाएन्ट्सने ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील केले आहे. याआधी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता.
advertisement
3/7
26 वर्षांच्या अर्जुनने आतापर्यंत 22 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 48 विकेट्स घेतल्या असून 620 रन्स केल्या आहेत. तसेच 29 टी-20 मॅचेसमध्ये त्याने 35 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
advertisement
4/7
युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी अर्जुनच्या खेळाचे विश्लेषण करताना एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. पत्रकारांशी बोलताना योगराज सिंह म्हणाले की, अर्जुनने आपल्या बॉलिंगपेक्षा बॅटिंगवर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
advertisement
5/7
योगराज यांच्या मते, अर्जुन हा एक 'क्वालिटी बॅटर' असून त्याच्या फलंदाजीत त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांची झलक पाहायला मिळते. अर्जुनने बॅट्समन म्हणून स्वतःला विकसित केल्यास तो अधिक यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय
advertisement
6/7
अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1 शतक झळकावले असून दोन वेळा 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. आता तो योगराज सिंह यांच्या सल्ल्यानुसार आपल्या फलंदाजीत सुधारणा करतो का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
advertisement
7/7
दरम्यान, युवराज केवळ एक उत्तम खेळाडू नाही तर त्याच्याकडे यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदात युवराजचा समावेश व्हायला हवा, असंही योगराज सिंग यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 'अर्जुनची बॅटिंग सचिनसारखी, बॉलिंग सोड अन्...', कुणी दिला क्रिकेटच्या देवाच्या मुलाला सल्ला?