TRENDING:

Shah Rukh Khan : "शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...", कुणी केली घोषणा? नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
BJP leader Slam Shah Rukh Khan : जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही 1,00,000 रुपयाचे रोख बक्षीस देऊ, असं मीरा राठोड यांनी जाहीर केलं.
advertisement
1/7
"शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...", नेमकं प्रकरण काय?
आयपीएलच्या लिलावात शाहरुख खान याने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्ताफिजूर रहमान खान याला सुमारे 9.5 कोटी रुपयांना आपल्या टीममध्ये सामील करून घेतले आहे. या निर्णयावरून भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर जोरदार निशाणा साधला आहे.
advertisement
2/7
बांगलादेशात हिंदू धर्मीयांवर होणारे अत्याचार आणि तिथली हिंसा पाहता, त्याच देशातील खेळाडूला एवढ्या मोठ्या रकमेत खरेदी करणे हे योग्य नाही, असे सोम यांनी म्हटले आहे.
advertisement
3/7
या निर्णयामुळे देशातील एका वर्गामध्ये शाहरुख खानबद्दल प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. या वादात आता हिंदू महासभेनेही उडी घेतली असून, त्यांनी शाहरुख खानचा तीव्र निषेध केला आहे.
advertisement
4/7
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड यांनी या कृतीचा जाहीर निषेध करताना अत्यंत टोकाची भूमिका मांडली आहे. बांगलादेशात हिंदू बांधवांची हत्या होत असताना, शाहरुखने तिथल्या खेळाडूला खेळवणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
5/7
यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी शाहरुखच्या प्रतिकात्मक फोटोला काळं फासून आपला निषेध नोंदवला. मीरा राठोड यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत शाहरुख खान विरोधात वादग्रस्त विधान केले असून, त्यांनी त्याच्या विरोधात बक्षीसही जाहीर केले आहे.
advertisement
6/7
जो कोणी शाहरुख खानची जीभ छाटेल, त्याला आम्ही 1,00,000 रुपयाचे रोख बक्षीस देऊ, असं मीरा राठोड यांनी जाहीर केलं. या सर्व प्रकरणावर अद्याप शाहरुख खान किंवा आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
advertisement
7/7
दरम्यान, यामुळे आयपीएल सिझनमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुस्ताफिजूर रहमान याला खेळण्याची संधी मिळणार का? की केकेआर त्याला बाहेर बसवणार, असा सवाल विचारला जातोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shah Rukh Khan : "शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...", कुणी केली घोषणा? नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल