TRENDING:

Guess Who : कपूर घराण्याचा मुलगा, दिले फ्लॉपवर फ्लॉप सिनेमे, पण या सिनेमामुळे झाला इंडस्ट्रीचा 'आशिक'

Last Updated:
Kapoor Family Son : कपूर कुटुंबातील एका मुलाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा तो स्टारकिड म्हणून ओळखला जात होता. पण आज अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
1/7
Guess Who : कपूर घराण्याचा मुलगा, या सिनेमामुळे झाला इंडस्ट्रीचा 'आशिक'
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात देखणा आणि टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक अर्थात आदित्य रॉय कपूर आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. फिल्म इंडस्ट्रीत स्टार किड म्हणून प्रवेश करूनही आदित्यने मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःला एक मोठा स्टार म्हणून सिद्ध केलं आहे. आदित्य रॉय कपूरने हे दाखवून दिलं आहे की टॅलेंट कोणत्याही पार्श्वभूमीला मागे टाकू शकतं.
advertisement
2/7
आदित्य रॉय कपूरचा बॉलिवूडमधील करिअर प्रवास खूपच रंजक राहिला आहे. आदित्य जन्म फिल्मी कुटुंबात झाला. तो स्टार किड असूनही त्याला माहिती होतं की इंडस्ट्रीत त्याला स्वत:लाच सिद्ध करावं लागणार आहे. आदित्यने सुरुवातीला व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले आणि नंतर चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. त्याने 2009 मधील ‘लंडन ड्रीम्स’, 2010 मधील ‘ॲक्शन रीप्ले’ आणि ‘गुजारिश’ या चित्रपटांत छोट्या-छोट्या भूमिका केल्या. पण या भूमिकांमधून त्याला अपेक्षित विशेष ओळख मिळाली नाही.
advertisement
3/7
आदित्य रॉय कपूरसाठी 2013 मध्ये आलेला 'आशिकी 2' हा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर धमाका केला नाही, तर स्वत:ची एक सुपरस्टार म्हणूनही ओळख निर्माण केली. श्रद्धा कपूरसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली आणि या यशामुळे आदित्यचे नाव इंडस्ट्रीत वेगाने पसरले. त्याचा रोमँटिक अंदाज आणि अभिनयाची खूप प्रशंसा झाली.'आशिकी 2'च्या माध्यमातून तो इंडस्ट्रीचा 'आशिक' झाला.
advertisement
4/7
'आशिकी 2' नंतर आदित्यने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. ‘ये जवानी है दिवानी’, ‘दावत-ए-इश्क’, ‘फितूर’, ‘ओके जानू’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘मलंग’ अशा चित्रपटांमध्ये आदित्य रॉय कपूरने आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
5/7
आदित्यच्या करिअरमध्ये एक काळ असा आला जेव्हा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले. त्याचे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले मेट्रो इन दिनो आणि गुमराह हे चित्रपटदेखील फ्लॉप ठरले आहेत.
advertisement
6/7
आदित्यच्या अभिनयाची नेहमीच प्रशंसा होत राहिली आहे. आता त्याच्या आगमी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. आज आदित्य रॉय कपूरवर चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
7/7
आदित्य रॉय कपूर त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखला जातो. अनेकदा अभिनयापेक्षा व्यक्तीमत्त्वामुळे तो चर्चेत येतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : कपूर घराण्याचा मुलगा, दिले फ्लॉपवर फ्लॉप सिनेमे, पण या सिनेमामुळे झाला इंडस्ट्रीचा 'आशिक'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल