Mobile Interesting Fact : मोबाइल सायलेंटवर असतानाही अलार्म कसा वाजतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Interesting Fact : मोबाईल सायलेंट मोडवर असतानाही अलार्म वाजण्यामागे स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं खास डिझाइन आणि तांत्रिक कारणं दडलेली आहेत.
advertisement
1/5

मीटिंगमध्ये, ऑफिसमध्ये किंवा रात्री झोपतान आपण अनेकदा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवत पण सायलेंट असूनही सकाळचा अलार्म मात्र वेळेत आणि मोठ्याने वाजतो. हे कसं काय? यामागे स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं खास डिझाइन आणि तांत्रिक कारणं दडलेली आहेत.
advertisement
2/5
फोनचा सायलेंट मोड हा फक्त नोटिफिकेशन्स, कॉल्स आणि मेसेजेसचे आवाज बंद करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. म्हणजेच हे फक्त यूजर-ट्रिगरड म्हणजे युझर्स जेव्हा काही करेल तेव्हा येणारे आवाज थांबवतं.
advertisement
3/5
पण अलार्म हा सिस्टम-लेव्हल फिचर आहे, मोबाईलमध्ये अलार्म मॅनेजर किंवा क्लॉक सर्व्हिस नावाची स्वतंत्र सेवा कार्यरत असते. ही सेवा ऑपरेटिंग सिस्टीमच्या आत चालते, तिच्यावर सायलेंट मोडचा परिणाम होत नाही.
advertisement
4/5
अलार्मचं उद्दिष्ट म्हणजे दिलेल्या वेळी युझर्सला उठवणं, मग तो फोन सायलेंटवर असो किंवा नसो. यासाठी अँड्रॉइड आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अलार्मला हायेस्ट प्रायोरिटी ऑडिओ स्ट्रिम देण्यात आली आहे. त्यामुळे अलार्मचा आवाज नोटिफिकेशन्सपेक्षा वेगळ्या अलार्म चॅनेलद्वारे वाजतो.
advertisement
5/5
सायलेंड मोडच नाही तर मोबाईल डीएनडी म्हणजे डू नॉट डिस्टर्ब मोडवर असचानाही डीफॉल्ट सेटिंगनुसार अलार्मला वाजण्याची परवानगी दिलेली असते, कारण ते युझर्ससाठी अत्यंत गरजेचे मानलं जातं. त्यामुळे फोन पूर्ण शांत असला तरी अलार्म व्यवस्थित वाजतो. म्हणून फोन सायलेंटवर ठेवला तरी काळजी करू नका, अलार्म वेळेवर वाजणारच.