ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी भलत्याच अवतारात दिसली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, पृथ्विक प्रतापने क्लिक केले PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/8

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्याबरोबरच कलाकार तिथल्या सुंदर ठिकाणांचा आनंद घेताना दिसत आहेत.
advertisement
2/8
सोशल मीडियावर या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच या टीममधील एका अभिनेत्रीचा वेगळाच अवतार सध्या चर्चेत आला आहे.
advertisement
3/8
दौऱ्यादरम्यान हास्यजत्रा टीम ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली होती. याच वेळी अभिनेत्री वनिता खरातने बीचवर खास फोटोशूट केलं. वनिताचा हा लूक तिच्या नेहमीच्या इमेजपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्यामुळे चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
4/8
या फोटोशूटमध्ये वनिता खरात ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यावर तिने व्हाइट कलरचा शर्ट घातला आहे. समुद्रकिनाऱ्यावर उभी राहून तिने दिलेल्या बोल्ड पोझेस देत फोटो क्लिक केलेत.
advertisement
5/8
तिच्या या फोटोशूटमध्ये ती खूप कॉन्फिडन्ट दिसत आहे. "मी माझ्या अशा एका रूपात जे तुम्ही यापूर्वी कधीच पाहिले नाही", असं कॅप्शन देत वनिताने फोटो शेअर केलेत. तिने #thatbrowngirl आणि #curvyandconfident असे हॅशटॅग वापरत स्वतःच्या कॉन्फिडन्सची झलक दाखवली आहे.
advertisement
6/8
या फोटोशूटची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे फोटो अभिनेता पृथ्विक प्रतापने क्लिक केले आहेत. याची माहिती स्वतः वनिताने पोस्टमध्ये दिली आहे. हास्यजत्रामधील हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत.
advertisement
7/8
वनिताच्या या फोटोशूटला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'उफ्फ', 'अप्रतिम', 'खूप सुंदर' अशा कमेंट्स करत अनेकांनी तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या बोल्ड लूकवरून तिला ट्रोल देखील केलं आहे. .
advertisement
8/8
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या या फोटोशूटमुळे वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा कॉन्फिडंट आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना आवडत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी भलत्याच अवतारात दिसली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री, पृथ्विक प्रतापने क्लिक केले PHOTO