Akshaye Khanna on Dhurandhar : मोजून 3 शब्दात केलं कौतुक, 'रहमान डकैत' फेमस होताच अक्षय खन्नाची पहिली रिअॅक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता अक्षय खन्ना धुरंधर सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. धुरंधर सिनेमाला मिळत असलेलं यश आणि त्याच्या रहमान डकैतला मिळत असलेल्या प्रेमावर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
advertisement
1/8

धुरंधर सिनेमा रिलीज होऊन 12 दिवस झाले आहेत. सिनेमाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. अभिनेता अक्षय खन्नाची सिनेमातील भूमिका विशेष लोकप्रिय ठरली आहे. अक्षय खन्नाने धुरंधरमध्ये गँगस्टर रहमान डकैतची भूमिका साकारली आहे.
advertisement
2/8
अक्षयसह सिनेमातील सगळ्याच कलाकारांचं कौतुक होतंय. कलाकारांनी समोर येऊन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. पण या सगळ्यात अक्षय खन्ना मात्र सगळ्या प्रसिद्धीपासून दूर आहे. प्रेक्षकांकडून त्याला मिळत असलेलं प्रेम तो दूर राहून अनुभवत आहे.
advertisement
3/8
धुरंधर सिनेमानं 400 कोटींची कमाई केली आहे. स्वत: अक्षय खन्नाला इतकी प्रसिद्धी मिळतेय. यावर अक्षय खन्नाची काय प्रतिक्रिया आहे.
advertisement
4/8
धुरंधरचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी अक्षय खन्नाची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. मिस मालिनीशी बोलताना ते म्हणाले, "अक्षय खन्ना एक असा अभिनेता आहे ज्याची नोट कधीच नकली किंवा उधार वाटत नाही. तो जे काही करतो त्यात स्वत:चे एलिमेन्ट आणतो. तो इतक्या विश्वासाहार्यतेनं काम करतो की तुम्हाला त्याच्यावर प्रेम करणं भागं पडलं."
advertisement
5/8
"आज सकाळीच माझं त्याच्याशी बोलणं झालं. तो खूप बेफिक्र होता. तो फक्त इतकंच म्हणाला, हां, मजा आया."
advertisement
6/8
मुकेश छाब्रा पुढे म्हणाले, "त्याला माहिती आहे की तो त्याचं काम किती प्रेमानं करतो. मी जेव्हा सेटवर जायचो तेव्हा मला त्याची प्रोसेस समजली. तो त्याच्या स्पेसमध्ये राहतो. तो त्याच्या ऑरा खूप सांभाळतो. त्याचे सीन्स तो अनेकदा वाचतो आणि पूर्ण तयारीत असतो. त्याची हिच जादू त्याच्या कामात दिसते."
advertisement
7/8
रहमान डकैत बनून अक्षय खन्नाने धुरंधरमध्ये FA9LA या गाण्यावर छोटासा डान्स केला आहे. त्याची एन्ट्री आणि डान्स दोन्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. धुरंधर सिनेमानं तब्बल 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
advertisement
8/8
एकीकडे धुरंधरचं सक्सेस सुरू असताना अक्षय खन्ना त्याच्या अलिबागच्या घरी वास्तुशांती करताना दिसला. मुंबईपासून दूर तो अलिबागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात त्याचा वेळ घालवतोय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akshaye Khanna on Dhurandhar : मोजून 3 शब्दात केलं कौतुक, 'रहमान डकैत' फेमस होताच अक्षय खन्नाची पहिली रिअॅक्शन