TRENDING:

33 वर्षांआधी आलेलं मराठी नाटक, 100 हून अधिक कलाकारांनी केलं काम; आजही हाऊसफुल, रचला नवा रेकॉर्ड

Last Updated:
1993 साली आलेलं मराठी नाटक आज 33 वर्षांनीही हाऊसफुल सुरू आहे. या नाटकाच्या नव्या टीमनं आता एका नवा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
1/8
33 वर्षांआधी आलेलं मराठी नाटक, आजही हाऊसफुल; रचला नवा रेकॉर्ड
मराठी नाटक सध्या जोरदार सुरू आहेत. मराठी प्रेक्षक सिनेमांपेक्षा नाटकाला सर्वाधिक गर्दी करताना दिसत आहेत. अनेक नवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत जी हाऊसफुल सुरू आहेत. काही जुनी नाटकं देखील नव्यानं रंगभूमीवर आली असून त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 
advertisement
2/8
असंच एक 33 वर्षांआधी आलेलं नाटक आजही हाऊसफुलची पाटी मानाने मिरवत आहे. तरुण वर्गापासून वृद्धांपर्यंत सगळेच नाटकाला पसंती देत आहेत. या नाटकात आतापर्यंत 100 हून अधिक मराठी कलाकारांनी काम केलं आहे. 
advertisement
3/8
33 वर्षांनंतर 2026 साली हे नाटक एका नव्या टीमसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि अवघ्या काही महिन्यात या नाटकानं एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. 
advertisement
4/8
आपण बोलत आहोत ते नाटक म्हणजे 'ऑल दि बेस्ट'. 31 डिसेंबर 1993 रोजी देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला.
advertisement
5/8
आज तेहत्तीस वर्षानंतरही 2026 साली सुद्धा नाटकाचे प्रयोग देवेंद्र पेम यांच्या अनामय प्रॉडक्शन्स या संस्थेतर्फे अविरत सुरू आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या नाटकाच्या पहिल्या टीमने रसिक प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. भरत, अंकुश, संजय हे तिघेही गुणी कलाकार सुपरस्टार झाले.
advertisement
6/8
श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, दिपा परब ही दुसरी टीम होती तेही सुपरस्टार झाले. त्यानंतर नाटकाच्या जवळपास 25 टीम्स झाल्या. 5000 प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या 'ऑल दि बेस्ट' नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
advertisement
7/8
तीच जादू नाटकाची नवीन टीम निखिल चव्हाण जुई बेंडखळे मयुरेश पेम आणि मनमित पेम करत आहेत. 'ऑल दि बेस्ट' च्या या नवीन टीमवर सुद्धा रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम करत आहेत. म्हणुनच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे जोरदार हाउसफुल्ल प्रयोग सुरू असून लंडन दुबई येथे सुद्धा हाऊसफुल्ल परदेश दौरे या टीमने केले आहेत.
advertisement
8/8
आता लवकरच ही नवीन टीम अवघ्या 2 वर्षात 3000 प्रयोगांचा टप्पा पार करत आहे. 'ऑल दि बेस्ट' नाटकाचा 300 वा प्रयोग रविवार 12 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे धुमधडाक्यात संपन्न होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
33 वर्षांआधी आलेलं मराठी नाटक, 100 हून अधिक कलाकारांनी केलं काम; आजही हाऊसफुल, रचला नवा रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल