TRENDING:

रणवीर सिंहनंतर 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करणार सारा अर्जुन, नव्या प्रोजेक्टमधील INSIDE PHOTO लीक

Last Updated:
Sara Arjun Upcoming Project: 'धुरंधर २' ने १००० कोटींचा टप्पा गाठला असतानाच, साराच्या नव्या मोठ्या प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
1/9
रणवीरनंतर सारा अर्जुन 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स, INSIDE PHOTO लीक
सध्या संपूर्ण जगभरात एकच नाव गाजतंय ते म्हणजे 'धुरंधर २'. या फिल्मने अवघ्या ७ दिवसांमध्ये तब्बल १००० कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. रणवीर सिंग स्टार आणि आदित्य धर दिग्दर्शित या फिल्ममध्ये संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या कामाचं तुफान कौतुक होत आहे.
advertisement
2/9
या फिल्ममधील प्रत्येक पात्राने आपल्या भूमिका चोख पार पाडल्या असून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच अभिनेत्री सारा अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
3/9
याआधी 'धुरंधर'च्या पहिल्या भागानंतर सारा अर्जुनने इम्तियाज अलीची 'हीर रांझा' फिल्म साइन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र यावर 'धुरंधर'चे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांनी पूर्णविराम देत या अफवा खोट्या असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
4/9
मुकेश यांनी म्हटलेलं, "सारा अर्जुनने कोणतीही दुसरी फिल्म साइन केलेली नाही. आम्ही फक्त 'धुरंधर २' ची वाट पाहत आहोत. साराने कोणतीही फिल्म साइन केलेली नाही आणि यासंबंधी ती कोणालाही भेटलेली नाही. त्यामुळे सर्वांनी शांत व्हा. तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल मी स्वतः माहिती देईन."
advertisement
5/9
दरम्यान, आता 'धुरंधर २' ने १००० कोटींचा टप्पा गाठला असतानाच, साराच्या नव्या मोठ्या प्रोजेक्टवर शिक्कामोर्तब झालं आहे. यावेळी ती बॉलिवूडचा हँडसम हंक ईशान खट्टरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असून लवकरच प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/9
काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी सोशल मीडियावर एका स्क्रिप्टचा फोटो शेअर केला होता. या प्रोजेक्टचं नाव 'ए परफेक्ट मॅच' असं असून, त्यातील 'कबीर आणि नव्या' या पात्रांच्या भूमिकेत ईशान आणि सारा दिसतील, अशी चर्चा रंगली आहे.
advertisement
7/9
नुकतेच या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगमधील काही बीटीएस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये सारा आणि ईशान एकत्र काम करताना दिसत आहेत.
advertisement
8/9
विशेष म्हणजे, 'खो गये हम कहाँ' फेम दिग्दर्शक अर्जुन वरेन सिंग या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहेत. झोया अख्तर आणि रीमा कागटी यांच्या 'टायगर बेबी' बॅनरखाली हा प्रोजेक्ट साकारला जात आहे.
advertisement
9/9
धुरंधरमधील सारा अर्जुन आणि रणवीर सिंग यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. २० व्या वर्षी इतक्या मोठ्या स्टार्ससोबत इतक्या प्रभावीपणे काम केल्याबद्दल तिचे प्रेक्षकांनीच नाही, तर समीक्षकांनीही खूप कौतुक केले आहे. अशातच आता ईशानसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय की नाही, हे येणारा काळच सांगेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर सिंहनंतर 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करणार सारा अर्जुन, नव्या प्रोजेक्टमधील INSIDE PHOTO लीक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल