TRENDING:

IPL 2026 : बोल्ट-सॅन्टनरना डच्चू... मुंबई इंडियन्सचे 4 फॉरेनर कोण? पहिल्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतली सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना रविवार 29 मार्चला खेळणार आहे.
advertisement
1/9
बोल्ट-सॅन्टनरना डच्चू... मुंबई इंडियन्सचे 4 फॉरेनर कोण? पहिल्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन!
29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स कागदावर सगळ्यात मजबूत टीम दिसत आहे, कारण टीममध्ये दिग्गज खेळाडू आहेत.
advertisement
2/9
मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण 2020 नंतर मुंबईला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
advertisement
3/9
आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने टीममध्ये काही खेळाडू ट्रेड करून आणले तर लिलावामध्ये काही जणांना विकत घेतलं. शरफेन रदरफोर्ड आणि शार्दुल ठाकूर यांना मुंबईने ट्रेड केलं. तर क्विंटन डिकॉकला मुंबईने लिलावात विकत घेतलं.
advertisement
4/9
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाआधी मुंबईने त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग आणखी मजबूत केली आहे, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये मुंबई कुणाला उतरवणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
advertisement
5/9
मुंबईची बॅटिंग ऑर्डर कशी असेल हे जवळपास निश्चित आहे, पण फिनिशर आणि बॉलिंगमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट वेगवेगळी मतं मांडत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही मुंबईची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते सांगितलं आहे.
advertisement
6/9
आकाश चोप्राने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल सॅन्टनर यांना संधी दिलेली नाही, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. मिचेल सॅन्टनर हा न्यूझीलंडच्या टी-20 टीमचा कर्णधार आहे, सॅन्टनरच्या नेतृत्वातच न्यूझीलंड यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप फायनलला पोहोचली होती.
advertisement
7/9
ट्रेन्ट बोल्ट हा मुंबईचा मागच्या मोसमातला सगळ्यात यशस्वी बॉलर होता, पण त्यालाही आकाश चोप्राने सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संधी दिली नाही.
advertisement
8/9
रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, विल जॅक्स ही मुंबईची बॅटिंग ऑर्डर असेल तर नमन धीर सातव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका पार पाडेल, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.
advertisement
9/9
कॉर्बिन बॉश हा बॉलिंगसोबतच आठव्या क्रमांकावर उत्कृष्ट बॅटरही आहे. यानंतर दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर हे बॉलर असतील, असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं आहे. शार्दुल ठाकूर आणि मयंक मार्कंडे मुंबईसाठी इम्पॅक्ट सबचे पर्याय असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बोल्ट-सॅन्टनरना डच्चू... मुंबई इंडियन्सचे 4 फॉरेनर कोण? पहिल्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल