कॅप्टन सूर्यकुमारवर आरोप करणं चांगलंच शेकलं, अभिनेत्रीवर 100 कोटींचा खटला, अटकही होणार?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Suryakumar Yadav: गेल्या काही दिवसांपासून सूर्यावर मेसेज केल्याचे आरोप करून खळबळ उडवून देणारी मॉडेल खुशी मुखर्जी आता भलतीच गोत्यात आली आहे.
advertisement
1/8

भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या मैदानावर आपल्या फॉर्मशी झुंज देत असला, तरी मैदानाबाहेर मात्र एक वेगळ्याच प्रकरणामुळे तो चर्चेत आला आहे.
advertisement
2/8
गेल्या काही दिवसांपासून सूर्यावर मेसेज केल्याचे आरोप करून खळबळ उडवून देणारी मॉडेल खुशी मुखर्जी आता भलतीच गोत्यात आली आहे. सूर्याने जरी या आरोपांकडे दुर्लक्ष केलं असलं, तरी त्याच्या एका चाहत्याने या प्रकरणाचा असा काही वचपा काढला आहे की, खुशीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
advertisement
3/8
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे राहणाऱ्या फैजान अंसारी या सूर्याच्या कट्टर चाहत्याने खुशी मुखर्जीच्या विरोधात थेट १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला भरला आहे. फैजानच्या मते, खुशीने केवळ प्रसिद्धीसाठी सूर्यावर खोटे आरोप केले असून, यामुळे भारतीय कर्णधाराची जागतिक स्तरावर नाहक बदनामी झाली आहे.
advertisement
4/8
इतकंच नाही, तर त्याने गाझीपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा यांच्याकडे धाव घेऊन फैजानने या मॉडेलला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
advertisement
5/8
२०२५ च्या शेवटी खुशीने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्सचा आधार घेत दावा केला होता की, सूर्या तिला पर्सनल मेसेज करायचा. या दाव्यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली होती. आता मात्र परिस्थिती बदललेली पाहून खुशीने सारवासारव सुरू केली आहे.
advertisement
6/8
"माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला," अशी सारवासारव ती आता करू लागली आहे. रिपोर्टनुसार, खटल्याची भीती पाहून खुशी आता माफी मागून हे प्रकरण मिटवण्याच्या मनस्थितीत आहे, मात्र फॅन्स तिला इतक्या सहज सोडायला तयार नाहीत.
advertisement
7/8
एकीकडे हे वाद सुरू असतानाच, दुसरीकडे सूर्याचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरत आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यांत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, ज्यामुळे संघातल्या त्याच्या जागेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
advertisement
8/8
येत्या २१ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्याला बॅटने चोख उत्तर द्यावं लागणार आहे. एका बाजूला प्रसिद्धीसाठी केले जाणारे आरोप आणि दुसरीकडे कामगिरीचा दबाव, अशा कचाट्यात टीम इंडियाचा कॅप्टन अडकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कॅप्टन सूर्यकुमारवर आरोप करणं चांगलंच शेकलं, अभिनेत्रीवर 100 कोटींचा खटला, अटकही होणार?