TRENDING:

'जिंदगी बीत गई लेकिन…', वयाच्या 83 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली खंत, होतोय या गोष्टींचा पश्चाताप

Last Updated:
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी एक खंत व्यक्त केली आहे.
advertisement
1/7
'जिंदगी बीत गई लेकिन…', वयाच्या 83 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली खंत
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नव्या ब्लॉगमध्ये सांगितले की आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना कोणत्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. यासह काही गोष्टी योग्य वेळी शिकता न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन 83 वर्षांचे झाले असले, तरी या वयातही ते अत्यंत सक्रिय आहेत. सलग चित्रपट, शो आणि जाहिरातींचे शूटिंग करत असतानाच ते सोशल मीडियासाठीही वेळ काढतात.
advertisement
3/7
बिग बी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतात. कधी आपल्या चित्रपटांबद्दल, तर कधी खासगी आयुष्याची झलक चाहत्यांना दाखवत असतात. अशातच त्यांचा लेटेस्ट ब्लॉग चर्चेत आला आहे, ज्यात त्यांनी काही गोष्टींबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना काही गोष्टी योग्य वेळी शिकता न आल्याची खंत आहे. आपल्या कामाशी संबंधित अनेक गोष्टी वेळेवर शिकता न आल्याचा त्यांना पश्चात्ताप वाटतो आणि ही बाब त्यांना सतत बोचत राहते.
advertisement
5/7
बिग बी लिहितात,“दररोज काही ना काही नवीन शिकायला मिळते, पण दुर्दैव हे आहे की ज्या गोष्टी शिकायला हव्या होत्या, त्या अनेक वर्षांपूर्वीच शिकायला हव्या होत्या.” आपल्या पोस्टमध्ये पुढे ते लिहितात, “पश्चात्ताप जास्त यासाठी वाटतो की जे काही आज शिकले जात आहे, ते त्या काळात अस्तित्वातच नव्हते… आणि आता शिकण्याची इच्छा, प्रयत्न आणि ऊर्जा वय आणि वेळेसोबत कमी होत चालली आहे.
advertisement
6/7
नवीन शोध आणि तंत्रज्ञानाचा वेग इतका प्रचंड आहे की तुम्ही ते शिकायला सुरुवात करता, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आज अनेक मीटिंग्समधून हाच निष्कर्ष निघतो की आधी मूलभूत गोष्टी नीट समजून घ्याव्यात आणि नंतर काम पूर्ण करण्यासाठी आजच्या काळातील सर्वोत्तम टॅलेंट आणि तज्ज्ञांना नेमावे, म्हणजे काम पूर्ण होईल, असं अमिताभ बच्चन म्हणतात.
advertisement
7/7
बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हेही सांगितले की एखादे काम स्वतःला जमत नसेल तर ते कसे करून घ्यावे. बिग बी लिहितात,“जर तुम्हाला एखादे काम माहित नसेल किंवा ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पात्र नसाल, तर काही हरकत नाही. ते स्वीकारा, मग तुमच्या पसंतीच्या तज्ज्ञांना ते सोपवा आणि काम पूर्ण करून घ्या. काम स्वीकारले… तज्ज्ञ नेमले… आणि काम झाले… माझ्या काळात, जर तुम्हाला एखाद्या कामाची माहिती नसेल तर तुम्हाला पश्चात्ताप व्हायचा आणि तुम्ही ते काम करू शकत नव्हतात… पण आता तसे नाही. तुम्ही काम हातात घेता आणि आउटसोर्सिंगद्वारे ते पूर्ण करून घेता. वा! योग्य शब्द वापरल्याने किती हलके वाटले!”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जिंदगी बीत गई लेकिन…', वयाच्या 83 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली खंत, होतोय या गोष्टींचा पश्चाताप
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल