मुंबईतील या भागात करण जौहरने खरेदी केलंय आलिशान घर, असं काय आहे खास? किंमत ऐकून उडेल झोप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Karan Johar : करण जौहरने मुंबईतील खार या भागात आलिशान घर (लक्झरी अपार्टमेंट) खरेदी केलं आहे.
advertisement
1/7

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर करण जौहरने मुंबईतील खार वेस्ट या परिसरात कोट्यवधी रुपयांचा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये नोंदणीकृत झालेल्या या डीलमुळे खार वेस्ट पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या आवडत्या रिअल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून चर्चेत आलं आहे.
advertisement
2/7
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठे आणि श्रीमंत फिल्ममेकर-प्रोड्युसर करण जौहरने मुंबईतील खार वेस्ट भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या प्रॉपर्टीची किंमत सुमारे 8.05 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. नोव्हेंबर 2025 मध्ये अधिकृतपणे ही डील नोंदणीकृत झाली होती.
advertisement
3/7
मुंबईतील प्रीमियम भागांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता करण जौहरचे नावही समाविष्ट झाले आहे. करण जौहरचे हे नवं घर खार वेस्टमधील ‘पाली विंटेज’ या इमारतीत आहे. सरकारी नोंदींनुसार, या फ्लॅटचा कार्पेट एरिया 1,060.13 चौरस फूट म्हणजेच 98.49 चौरस मीटर आहे. या प्रॉपर्टीसोबत त्याला दोन खास कार पार्किंग स्पेसही मिळाली आहे.
advertisement
4/7
करण जौहरचं नवं घर मुंबईतील खार या भागात आहे. खार वेस्ट हा मुंबईतील असा परिसर मानला जातो जिथे राहणे नेहमीच एक स्टेटस सिम्बॉल समजले जाते. हा परिसर उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखला जातो. लिंकिंग रोड, एस.व्ही. रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांशी हा भाग जोडलेला असल्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये सहज पोहोचता येते. त्यामुळेच मोठे उद्योगपती आणि चित्रपटसृष्टीतील तारे या परिसराला पसंती देतात.
advertisement
5/7
कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही खार वेस्ट खूप उत्तम आहे. खार रोड रेल्वे स्टेशनदेखील जवळच आहे, जे वेस्टर्न लाईनवर येते. यामुळे रोज ऑफिसला जाणाऱ्यांना मोठी सोय होते. तसेच हा परिसर बांद्रा, सांताक्रूझ आणि अंधेरी यांसारख्या पॉश भागांच्या अगदी जवळ आहे. बांद्रा-वर्ली सी लिंकच्या माध्यमातून साऊथ मुंबई, बीकेसी आणि लोअर परळ यांसारख्या बिझनेस हब्सपर्यंतही सहज जाता येते. गेल्या काही वर्षांत खार वेस्ट एक परिपक्व निवासी परिसर म्हणून उदयास आला आहे.
advertisement
6/7
करण जौहरने खरेदी केलेल्या नव्या घराच्या परिसरात शॉपिंग आउटलेट्स, कॅफे, रेस्टॉरंट्स, एंटरटेनमेंट झोन्स, नामांकित शाळा आणि चांगली रुग्णालये उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांमुळे हा परिसर प्रोफेशनल्स आणि कुटुंबांसाठी पहिली पसंती ठरतो. करण जौहर हिंदी सिनेसृष्टीतील मोठे नाव आहे.
advertisement
7/7
करण जौहरने ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ यांसारखे हिट चित्रपट दिले. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. दरम्यान, करण जौहर अनेक आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. यामध्ये ‘कभी खुशी कभी गम 2’ या सिनेमाचाही समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुंबईतील या भागात करण जौहरने खरेदी केलंय आलिशान घर, असं काय आहे खास? किंमत ऐकून उडेल झोप