मोगेंबो खुश हुआ! 7 दिवसांची मेहनत, थक्क करणारा खर्च, कसा तयार झाला अमरिश पुरींचा कॉस्च्युम?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mogambo look : 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील मोगेंबोचा लुक फक्त 7 दिवसांत तयार झाला होता. तब्बल 35 हजार रुपयांचा खर्च या कॉस्च्युमसाठी आला होता.
advertisement
1/7

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा 1987 मध्ये आलेला 'मिस्टर इंडिया' हा सुपरहिट चित्रपट आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातील मोगेंबोने चाहत्यांना वेड लावलं. चित्रपटातील 'मोगेंबो खुश हुआ' हा डायलॉग चांगलाच गाजला. पण मोगेंबोचा तो भव्य लुक कसा तयार झाला होता? त्यामागे एक अतिशय रंजक गोष्ट दडली आहे.
advertisement
2/7
'मिस्टर इंडिया' या चित्रपटाचे कॉस्च्युम डिझायनर माधव आगस्ती यांनी अलीकडेच मोगेंबोच्या लुकबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी मोगेंबोचा पोशाख फक्त सात दिवसांत तयार केला होता.
advertisement
3/7
अमरीश पुरी यांनी जेव्हा पहिल्यांदा मोगेंबोचा कॉस्च्युम पाहिला, तेव्हा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतकेच नव्हे, तर चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर यांनाही तो पोशाख खूप आवडला होता.
advertisement
4/7
माधव यांनी सांगितले की त्या काळात इतका जड आणि भव्य कॉस्च्युम तयार करणे सोपे नव्हते. हा पोशाख तयार करण्यात सुमारे 25 हजार रुपये खर्च आला होता, जो 80 च्या दशकात मोठी रक्कम मानली जात होती. पण जेव्हा बोनी कपूर यांनी तो पोशाख पाहिला, तेव्हा ते इतके खुश झाले की त्यांनी स्वतःहून 10 हजार रुपये जास्त दिले. अशा प्रकारे माधव यांना एकूण 35 हजार रुपये मिळाले.
advertisement
5/7
माधव यांच्या मते, जेव्हा अमरीश पुरी यांनी पहिल्यांदा आपला लुक पाहिला, तेव्हा ते हसत म्हणाले होते,"मोगेंबो खुश हुआ". त्यानंतर सेटवरील प्रत्येकाला हसू अनावर झाले होते.
advertisement
6/7
माधव आगस्ती फक्त मिस्टर इंडिया पुरतेच मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 350 हून अधिक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आणि इंडस्ट्रीत एक मोठे नाव निर्माण केले.
advertisement
7/7
मिस्टर इंडिया मधील मोगेंबोचा लुक आजही तितकाच लक्षात राहणारा आहे जितका चित्रपटाचा तो आयकॉनिक डायलॉग. हा लुक केवळ एका पात्राची ओळख ठरला नाही, तर हिंदी सिनेमाच्या इतिहासात एक नवीन अध्यायही लिहून गेला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मोगेंबो खुश हुआ! 7 दिवसांची मेहनत, थक्क करणारा खर्च, कसा तयार झाला अमरिश पुरींचा कॉस्च्युम?