'फक्त प्रेमावर लग्न टिकत नाही'; अमृता खानविलकर स्पष्टच म्हणाली, संसार टिकवण्यासाठी दिली खास टीप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amruta Khanvilkar : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच लग्न या विषयावर भाष्य केलं आहे. तसेच संसार टिकवण्यासाठी मुलांना खास टीपदेखील दिली.
advertisement
1/7

मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच लग्न या विषयावर भाष्य केलं आहे. दरम्यान संसार टिकवण्यासाठी मुलांना विशेष टीपदेखील अभिनेत्रीने दिली आहे.
advertisement
2/7
अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत अमृता खानविलकर म्हणाली,"फक्त प्रेम लग्नाला टिकवू शकत नाही. कारण जर कमावणारी मुलगी असेल, कमावणारा मुलगा असेल आणि दोघे एकत्र येऊन दोघांच्या कुटुंबियांना एकत्र करु पाहत आहेत तर त्यांनी प्रत्येक गोष्टीबाबत बोललं पाहिजे".
advertisement
3/7
लग्न ठरवताना प्रेमात पडलेल्या मुला-मुलींना त्यांना मुलं हवी आहेत की नको आहेत? आर्थिक नियोजन कसं करणार? आई-वडिलांना किती पैसे द्यायचे? एकत्र कुटुंबात राहायचं? की वेगळं राहायचं? त्याचे फायदे-तोटे काय आहेत? या सर्व गोष्टींवर चर्चा केली पाहिजे, असं अमृता म्हणाली.
advertisement
4/7
मुलांना संसार टिकवण्याची विशेष टीप देत अमृता खानविलकर म्हणाली," मुलांना मी अगदी नम्रपणे हे सांगते की कृपया हे इगोवर घेऊ नका. कारण ही गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे".
advertisement
5/7
अमृता म्हणाली,"आज संवाद नसल्याने अनेक घटस्फोट होत आहेत. संवाद करणं हे मानवजातीला मिळालेलं एक सुंदर यंत्र आहे. आपल्याला वरदान मिळालंय. मला असं वाटतं प्राणी हे करू शकत नाहीत. आपल्याला डोकं दिलंय, आपल्याकडे बोलायला शब्द आहेत. फक्त खा, कम्युनिटी वाढवा असं नाही आहे. आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत. त्यामुळे या सगळ्यागोष्टी इगोवर घेऊ नका. कारण या गोष्टी मुलांसाठी पण तितक्याच चांगल्या आणि गरजेच्या आहेत".
advertisement
6/7
अमृता पुढे म्हणाली,"बोलून विषय सुटतात. कम्युनिकेशन नसेल तर कदाचित इगो येऊ शकतो. संवाद हीच संसार टिकवण्याची गुरूकिल्ली आहे".
advertisement
7/7
अमृता खानविलकरने नटरंग, चंद्रमुखी, कट्यार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. तसेच नृत्याने घायाळ केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'फक्त प्रेमावर लग्न टिकत नाही'; अमृता खानविलकर स्पष्टच म्हणाली, संसार टिकवण्यासाठी दिली खास टीप