TRENDING:

मुंबई-पुण्यात घरं, कोट्यवधींची मालकीण; तरी अमृता खानविलकर म्हणे, 'मी मिडल क्लास कारण माझ्याकडे...'

Last Updated:
Amruta Khanvilkar on Middle Class : अमृता खानविलकर मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी आजही ती एक टिपिकल मिडलक्लास आयुष्य जगते.
advertisement
1/7
अमृता खानविलकर म्हणे,'मी मिडल क्लास कारण माझ्याकडे...'
अमृता खानविलकर हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट कलाकृतींचा ती भाग आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृता खानविलकरचा समावेश होतो. आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना थक्क करणारी अमृता आजही एक टिपिकल मिडलक्लास आयुष्य जगते.
advertisement
2/7
अमृता खानविलकरने नुकतंच 'अमुक-तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मिडलक्लासपणाबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. अमृताला मध्यमवर्गाने घडवलं असून आजही तिला या गोष्टीचा अभिमान आहे.
advertisement
3/7
मिडल क्लासबाबत बोलताना अमृता खानविलकर म्हणाली,"मिडलक्लासने मला घडवलं असून या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. मी मध्यमवर्गीय कॅटेगरीतले नसते तर मला कधीच पैशाची किंमत कळली नसती. मिडलक्लास नसते तर मी कमावलेल्या पैशाची उधळपट्टी केली असती".
advertisement
4/7
अमृता खानविलकर म्हणाली,"मिडलक्लास असल्यामुळे मला स्वत:वर ताबा ठेवता आला. घर कसं चालवायचं, माणसं कशी जोडून ठेवायची हे मला कळलं. मी एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे आणि या गोष्टीचा आजही मला तेवढाच अभिमान आहे".
advertisement
5/7
अमृता पुढे म्हणाली,"आजही माझ्याकडे कोणत्याही प्रकारची मर्सिडिज, ऑडी वगैरे नाही. मी घेऊ शकत नाही असं नाही आहे. पण मला स्वत:ला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही".
advertisement
6/7
अमृता म्हणते, मी घराची खूप शौकिन आहे. माझं पुण्यात एक घर आहे. मुंबईत दोन घरं आहेत. पण आता बास झालं. अजून किती घरं घ्यायची? मला जे जे आवडतं ते मी केलं आहे. आता माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे.
advertisement
7/7
अमृता खानविलकर नटरंग, कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी, राझी, सत्यमेव जयते अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग आहे. आपल्या फिटनेस आणि स्टाईलसाठी ती चर्चेत असते. अभिनयासह ग्लॅमर आणि नृत्यासाठी ती ओळखली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुंबई-पुण्यात घरं, कोट्यवधींची मालकीण; तरी अमृता खानविलकर म्हणे, 'मी मिडल क्लास कारण माझ्याकडे...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल