'इंडियन आयडॉल सीझन 3'च्या विजेत्याचे निधन, वयाच्या 43 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prashant Tamang Death: 'इंडियन आयडॉल सीझन 3'चे विजेते प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले आहे.
advertisement
1/7

'इंडियन आयडॉल सीझन 3'चे विजेते प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. गायक आणि कोलकाता पोलिस अधिकारी असलेले प्रशांत 2007 मध्ये प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले आणि त्यांच्या प्रवासाने लाखो लोकांना प्रेरणा दिली.
advertisement
2/7
गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग आता या जगात राहिले नाहीत. त्यांनी वयाच्या 43 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. 2007 मध्ये ‘इंडियन आयडॉल सीझन 3’ जिंकून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवलेल्या प्रशांत तमांग यांचे 11 जानेवारी 2026 रोजी, नवी दिल्ली येथे निधन झाले.
advertisement
3/7
मीडिया रिपोर्टनुसार, प्रशांत तमांग आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. अद्याप त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अहवालांनुसार हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही अधिकृत वैद्यकीय पुष्टीची प्रतीक्षा आहे.
advertisement
4/7
प्रशांत तमांग यांनी कधीकाळी कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम केले होते. त्या काळात ते पोलिस ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी होते आणि विविध पोलिस कार्यक्रमांत सादरीकरण करत असत.
advertisement
5/7
प्रशांत तमांग यांची कला पाहून अनेक वरिष्ठांनी त्यांना इंडियन आयडॉलमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रशांत यांनीही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. ऑडिशननंतर ते केवळ निवडलेच गेले नाहीत, तर सीझन 3 चे विजेतेही ठरले.
advertisement
6/7
प्रशांत ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत होते. यात त्यांनी डॅनियल लेचो या भूमिकेत दमदार अभिनय साकारत प्रशंसा मिळवली. इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर त्यांनी हिंदी आणि नेपाळी गाण्यांचा समावेश असलेला एक म्युझिक अल्बमही रिलीज केला होता. हिंदीसोबतच नेपाळी चित्रपटांमध्येही त्यांनी गायक आणि अभिनेता म्हणून काम केले.
advertisement
7/7
प्रशांत तमांग यांची यशोगाथा भारतीय रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजनमधील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक आहे. कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल असताना त्यांनी 2007 मध्ये ‘इंडियन आयडॉल सीझन 3’ साठी ऑडिशन दिले होते. इंडस्ट्रीकडून त्यांना फारसे पाठबळ मिळाले नव्हते. मात्र आपल्या प्रामाणिकपणाने त्यांनी संपूर्ण देशाचे मन जिंकले. त्यानंतर त्यांना जनतेकडून, विशेषतः दार्जिलिंग, गोरखा समुदाय आणि भारताच्या ईशान्य भागातून, प्रचंड पाठिंबा मिळाला. आता त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'इंडियन आयडॉल सीझन 3'च्या विजेत्याचे निधन, वयाच्या 43 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास