TRENDING:

'लाव रे तो फोटो', आदित्य ठाकरेंनी पाच फोटो दाखवले, राज ठाकरेंच्या स्टाईलने शिवाजी पार्क गाजवलं

Last Updated:
मुंबईतील विकासकामांवरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जोरदार श्रेयवादाची लढाई सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी मागील आठ दहा वर्षांतील फोटो दाखवून आम्हीच विकासकामे केल्याचा दावा सांगितला.
advertisement
1/5
'लाव रे तो फोटो', आदित्य ठाकरेंनी पाच फोटो दाखवले, शिवाजी पार्क गाजवलं
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची मुंबईत सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी झंझावाती भाषण केले. सत्तेत आल्यानंकर मुंबईकरांसाठी आपण काय करणार आहोत, हे त्यांनी सभेला संबोधित करताना सांगितले.
advertisement
2/5
मुंबईतील विकासकामांवरून ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जोरदार श्रेयवादाची लढाई सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी मागील आठ दहा वर्षांतील फोटो दाखवून आम्हीच विकासकामे केल्याचा दावा सांगितला.
advertisement
3/5
आदित्य ठाकरे यांनी त्यांचे काका राज ठाकरे यांच्या स्टाईलने 'लाव रे ते फोटो' म्हणत मुंबईतील कोस्टल रोड भूमिपूजन आणि त्यानंतरच्या पाहणीदरम्यानचे वेगवेगळे फोटो दाखवले. या फोटोत मुख्यमंत्री फडणवीस दिसत असतील तर मी तीन हजार देतो, असे ते मिश्किलपणे म्हणाले.
advertisement
4/5
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मिमिक्री केली. वॉटर-गटर-मीटर अशा मुद्द्यांवर महापालिकेचा प्रचार व्हायला पाहिजे. मात्र भाजपच्या प्रचारातून हे मुद्दे गायब असल्याचे सांगत मुंबईकरांसाठी आपण गेल्या काही वर्षांत काय काय केले, याचा पाढा आदित्य ठाकरे यांनी वाचला.
advertisement
5/5
आदित्य ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी तोंडभरुन कौतुक केले. आतपर्यंतच्या भाषणांपैकी आदित्य ठाकरे यांचे सर्वोत्तम भाषण होते, असे जयंत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'लाव रे तो फोटो', आदित्य ठाकरेंनी पाच फोटो दाखवले, राज ठाकरेंच्या स्टाईलने शिवाजी पार्क गाजवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल