Who Is Adithya Ashok : तमिलनाडुत जन्म, CSK च्या तालमीचा पैलवान, कोण आहे टीम इंडियासमोर उभा ठाकलेला न्यूझीलंडचा आदित्य अशोक?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Who Is Adithya Ashok : आदित्य अशोक हा मूळचा तमिळनाडूचा असलेला लेग-स्पिनर सध्या न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचे बालपण सिंगापूरमध्ये गेले आणि त्यानंतर तो न्यूझीलंडला स्थायिक झाला. भारतीय वंशाचा असूनही न्यूझीलंडच्या जर्सीत खेळताना पाहणे हे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरत आहे.
advertisement
1/7

न्यूझीलंडविरुद्ध पहिला वनडे सामना बडोदामध्ये खेळवला जातोय. यंदाच्या वर्षातील पहिला वनडे सामना खेळवला जात असल्याने आता क्रिडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच न्यूझीलंडच्या एका भारतीय वंशाच्या खेळाडूची चर्चा होताना दिसतीये.
advertisement
2/7
आदित्य अशोक हा मूळचा तमिळनाडूचा असलेला लेग-स्पिनर सध्या न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचे बालपण सिंगापूरमध्ये गेले आणि त्यानंतर तो न्यूझीलंडला स्थायिक झाला. भारतीय वंशाचा असूनही न्यूझीलंडच्या जर्सीत खेळताना पाहणे हे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरत आहे.
advertisement
3/7
आदित्यने डिसेंबर 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध आपला वनडे डेब्यु केला होता, तर त्याआधी ऑगस्ट 2023 मध्ये यूएईविरुद्ध त्याने एकमेव टी-20 मॅच खेळली होती. त्याने आतापर्यंत फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
4/7
आदित्यने 103 रन्स देऊन 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याव्यतिरिक्त लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 52 आणि टी-20 फॉरमॅटमध्ये 31 विकेट्स त्याच्या नावावर आहेत, ज्यामुळे तो एक घातक बॉलर मानला जातो. त्याने सीएसकेच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तयारी देखील केलीये.
advertisement
5/7
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 2020 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आदित्य न्यूझीलंडकडून खेळला होता. त्यावेळी त्याने भारताच्या यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंविरुद्ध मैदानात दोन हात केले होते.
advertisement
6/7
आता पुन्हा एकदा तोच संघर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉलवर फलंदाजाला अडचणीत टाकण्याची त्याची क्षमता पाहता, भारतीय फलंदाजांना त्याच्या ओव्हरमध्ये सावधपणे खेळावे लागणार आहे.
advertisement
7/7
भारतीय खेळपट्ट्या फिरकीसाठी पोषक असल्याने आदित्य अशोक या मॅचमध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. रोहित आणि विराटविरुद्ध याच्या विरोधात तो कशाप्रकारे बॉलिंग करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Who Is Adithya Ashok : तमिलनाडुत जन्म, CSK च्या तालमीचा पैलवान, कोण आहे टीम इंडियासमोर उभा ठाकलेला न्यूझीलंडचा आदित्य अशोक?