'आज तुझ्या घरी आले पण...', प्रथमेशच्या निधनाने भावुक झाली अंकिता वालावलकर, पोस्टमध्ये सांगितली मनातील 'ती' खंत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prathamesh Kadam Death: गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश कदम आजारपणाशी झुंज देत होता, पण दुर्दैवाने आज त्याची प्राणज्योत मालवली.
advertisement
1/8

सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो रील्स येतात आणि जातात, पण काही चेहरे आपल्या घराचा भाग होऊन जातात. असाच एक मराठमोळा तरुण, ज्याने आपल्या आईच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले आणि रील्सच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला हसवलं, तो प्रथमेश कदम आज आपल्यात नाही.
advertisement
2/8
गेल्या काही दिवसांपासून तो आजारपणाशी झुंज देत होता, पण दुर्दैवाने आज त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या अशा वळणावर प्रथमेशने एक्झिट घेतली, जिथे त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती.
advertisement
3/8
प्रथमेशची कहाणी फक्त रील्सपुरती मर्यादित नव्हती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे छत्र हरपले, तेव्हा अवघ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. आई प्रज्ञा कदम दु:खात बुडालेल्या असताना प्रथमेशने त्यांना सावरलं.
advertisement
4/8
इतकंच नाही, तर त्यांना रील्समध्ये सोबत घेऊन एका नवीन आयुष्याची ओळख करून दिली. 'माय-लेकाची' ही जोडी सोशल मीडियावर तुफान गाजली. आज आपल्या लाडक्या लेकाला या अवस्थेत पाहणाऱ्या आईची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
advertisement
5/8
प्रथमेशच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावरील त्याचे सहकारी आणि चाहते हादरून गेले आहेत. 'कोकण हार्टेड गर्ल' फेम अंकिता वालावलकर हिने प्रथमेशच्या घरी जाऊन त्याचं अंत्यदर्शन घेतलं आणि एक अत्यंत हृदयद्रावक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
6/8
अंकिताने म्हटलंय, "प्रथमेश, तू कितीतरी वेळा मला घरी यायला आमंत्रण दिलं होतंस, पण माझं कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या घरी आले पण तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. तुझ्या हतबल आईला पाहून काय बोलावं हेच कळत नाहीये. काही भेटी राहून गेल्याची खंत कायम मनात राहील. जिथे असशील तिथे असाच हसत राहा!"
advertisement
7/8
प्रथमेश कदमने त्याच्या आई आणि बहिणीसोबत अनेक मजेशीर आणि कौटुंबिक रील्स बनवले होते. साधी राहणी आणि निखळ विनोद यामुळे त्याने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. तो केवळ एक 'स्टार' नव्हता, तर अनेक तरुणांसाठी आपल्या कुटुंबाला कसं सांभाळायचं, याचं उदाहरण होता.
advertisement
8/8
पतीनंतर आता मुलालाही गमावल्यामुळे प्रथमेशच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात सोशल मीडियावरील त्याचे लाखो चाहते आपल्या लाडक्या स्टारच्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. "आम्ही तुझे मुलगे आहोत, आई काळजी नका करू," अशा कमेंट्स करत नेटकरी त्यांना आधार देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आज तुझ्या घरी आले पण...', प्रथमेशच्या निधनाने भावुक झाली अंकिता वालावलकर, पोस्टमध्ये सांगितली मनातील 'ती' खंत