TRENDING:

अनुषा दांडेकरला डच्चू, भूषण-केतकीने लग्नाआधीच दिली गुड न्यूज? नव्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग

Last Updated:
भूषण प्रधानने केतकी नारायणसोबत मॅटर्निटी फोटोशूटसारखे फोटो शेअर करत गोड सरप्राईज दिले, त्यामुळे चाहत्यांमध्ये लग्न आणि रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगली.
advertisement
1/7
अनुषा दांडेकरला डच्चू, भूषण-केतकीने लग्नाआधीच दिली गुड न्यूज? PHOTO VIRAL
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या हॉट लूक्समुळे नेहमीच चर्चेत असतो. पण, आता तो त्याच्या एका नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/7
भूषणने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते त्याला ‘लग्न कधी झालं?’ असं विचारत आहेत.
advertisement
3/7
भूषण प्रधानने त्याच्या इंस्टाग्रामवर अभिनेत्री केतकी नारायणसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये केतकीने साडी घातली आहे, तर भूषणने कुर्ता घातला आहे.
advertisement
4/7
पण, या फोटोंमधील पहिल्याच फोटोने चाहत्यांना गोंधळात पाडलं आहे. या फोटोत भूषणने केतकीच्या पोटावर हात ठेवून मॅटर्निटी फोटोशूटसारखी पोज दिली आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये ‘आमच्याकडे एक गोड सरप्राईज आहे’ असं लिहिलं आहे.
advertisement
5/7
भूषणची ही पोस्ट पाहताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. एका बाजूला तो अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असतो, तर दुसऱ्या बाजूला तो दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत शूट करताना दिसला. यामुळे अनेकांनी त्याला ‘अनुषाचं काय झालं?’ असा प्रश्नही विचारला आहे.
advertisement
6/7
या फोटोंवर चाहत्यांनी ‘एक मिनिट, तुझं लग्न कधी झालं?’, ‘फोटो बघून लग्न झालं आहे की बाळ होणार आहे, हेच कळत नाहीये’, ‘हे कधी झालं?’ अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
7/7
काहींनी तर त्याला अभिनंदनाचे मेसेजही पाठवले आहेत. आता भूषण आणि केतकी खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की, त्यांच्या एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी त्यांनी हे फोटोशूट केलं आहे, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अनुषा दांडेकरला डच्चू, भूषण-केतकीने लग्नाआधीच दिली गुड न्यूज? नव्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल