TRENDING:

Birthday Special: 15 व्या वर्षी रिजेक्शन पचवलं, आज आहे टॉपची अभिनेत्री, एकूण संपत्तीचा आकडा वाचून चक्रावेल डोकं

Last Updated:
Anushka Sharma Birthday: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं फॅमिली बॅग्राऊंड सिनेसृष्टीतील नाही मात्र या इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट, मेहनत घेतली. आणि शेवटी टॅलेंटने प्रेक्षकांची मने जिंकली.
advertisement
1/9
15व्या वर्षी रिजेक्शन पचवलं, आज टॉपची अभिनेत्री, एकूण संपत्तीचा आकडा चक्रावणारा!
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं फॅमिली बॅग्राऊंड सिनेसृष्टीतील नाही मात्र या इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट, मेहनत घेतली. आणि शेवटी टॅलेंटने प्रेक्षकांची मने जिंकली. अशीच एक अभिनेत्री जिने अवघ्या 15 व्या वर्षी रिजेक्शनचा सामना केला आज ती टॉपची अभिनेत्री आहे.
advertisement
2/9
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा आहे. 1 मे 1988 रोजी जन्मलेली अनुष्का यंदा तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
3/9
आज अनुष्का शर्मा हे बॉलिवूडमधील एक मोठं आणि यशस्वी नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. पण या प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी अनुष्कालाही खडतर संघर्षाचा सामना करावा लागला होता.
advertisement
4/9
अनुष्काला तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेकवेळा अपयशाचा आणि नकाराचा सामना करावा लागला. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिला पहिला नकार मिळाला होता. मात्र, तिने हार मानली नाही.
advertisement
5/9
प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अनुष्काला थेट किंग खान शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. 2008 मध्ये आदित्य चोप्रा यांच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अनुष्का पहिल्याच चित्रपटातून स्टार बनली.
advertisement
6/9
यानंतर तिने 'बदमाश कंपनी' आणि 'बँड बाजा बारात' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. 'बँड बाजा बारात' मधील तिची बिनधास्त भूमिका विशेष गाजली.
advertisement
7/9
अनुष्काने आपल्या कारकिर्दीत 'पटियाला हाऊस', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'जब तक है जान', 'मटरू की बिजली का मंडोला', 'पीके', 'एनएच 10', 'बॉम्बे वेल्वेट', 'दिल धडकने दो', 'सुलतान', 'ऐ दिल है मुश्किल', 'फिल्लौरी', 'जब हॅरी मेट सेजल' आणि 'परी' यांसारख्या अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
8/9
2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबतचा तिचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्यानंतर अनुष्काने काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला. या काळात तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली आणि इरफान खानच्या 'काला' चित्रपटात एक छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. आता ती लवकरच भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित 'चकदा एक्सप्रेस' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
9/9
आज अनुष्का शर्मा तब्बल 255 कोटी रुपयांची मालकिन आहे. ती केवळ चित्रपटांमधूनच नव्हे, तर स्वतःच्या फॅशन लेबल 'नश' (Nush), विविध गुंतवणुका आणि मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही मोठी कमाई करते. एका चित्रपटासाठी ती साधारणपणे 10 ते 15 कोटी रुपये मानधन घेते, तर एका जाहिरातीसाठी तिची फी ३ कोटी रुपये असते. तिच्याकडे आलिशान गाड्या आणि मुंबईमध्ये एक महागडं घर देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Birthday Special: 15 व्या वर्षी रिजेक्शन पचवलं, आज आहे टॉपची अभिनेत्री, एकूण संपत्तीचा आकडा वाचून चक्रावेल डोकं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल