TRENDING:

'अरुंधती'ची लाडकी 'ईशा' होणार जोशींची सून! अपूर्वा गोरेने पहिल्यांदाच शेअर केला सासरच्या मंडळींचा फोटो, म्हणाली...

Last Updated:
साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर आणि रेवती लेले यांच्यानंतर आता 'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरे हिनेही आपल्या आयुष्याच्या जोडीदार आणि सासरच्या मंडळींचे चेहरे जगासमोर आणले आहेत.
advertisement
1/7
अपूर्वा गोरेने पहिल्यांदाच शेअर केला सासरच्या मंडळींचा फोटो, म्हणाली...
मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई-चौघड्यांचा मोसम सुरू आहे. एकापाठोपाठ एक अभिनेत्री बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. साक्षी महाजन, ज्ञानदा रामतीर्थकर आणि रेवती लेले यांच्यानंतर आता 'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरे हिनेही आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा चेहरा जगासमोर आणला आहे.
advertisement
2/7
कालपर्यंत ज्याचा चेहरा लपवून अपूर्वाने चाहत्यांची उत्सुकता ताणली होती, तो चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'मुकुंद जोशी' म्हणजेच अभिनेता अंशुमन जोशी आहे.
advertisement
3/7
अपूर्वाने नुकताच एक खास फॅमिली फोटो शेअर करत या नात्याची अधिकृत घोषणा केली. या फोटोमध्ये केवळ अपूर्वा आणि अंशुमनच नाही, तर गोरे आणि जोशी ही दोन्ही कुटुंबं आनंदाने एकत्र दिसत आहेत.
advertisement
4/7
अपूर्वाने अत्यंत हळव्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "आनंदघन येई घरा. तुम्हा सर्वांना ओळख करून देतेय, गोरेंचा जावई आणि जोश्यांची सून! आम्हाला जोडणारं आणि नि:स्वार्थ प्रेम करणारं कुटुंब मिळालं, यासाठी आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो."
advertisement
5/7
अपूर्वा गोरे हिने 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या धाकट्या मुलीची, म्हणजेच ईशाची भूमिका साकारून घराघरात लोकप्रियता मिळवली. सध्या ती 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
advertisement
6/7
दुसरीकडे, अंशुमन जोशी हे नाव प्रत्येक मराठी सिनेप्रेक्षकाच्या काळजाजवळचं आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'शाळा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्याने साकारलेला 'मुकुंद जोशी' आजही विसरता येत नाही. अंशुमन केवळ अभिनेताच नाही, तर तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि फोटोग्राफर म्हणूनही ओळखला जातो.
advertisement
7/7
साखरपुड्याचे फोटो आणि आता कुटुंबाची ओळख करून दिल्यानंतर, ही जोडी कधी लग्नगाठ बांधणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. अपूर्वा आणि अंशुमन यांच्यातील हा साधेपणा आणि कौटुंबिक जिव्हाळा प्रेक्षकांना विशेष भावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अरुंधती'ची लाडकी 'ईशा' होणार जोशींची सून! अपूर्वा गोरेने पहिल्यांदाच शेअर केला सासरच्या मंडळींचा फोटो, म्हणाली...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल