ए. आर. रहमानच्या 800 गाण्यांपैकी हे एक गाणं, रेकॉर्ड होण्यापूर्वीच रातोरात झालं सुपरहिट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
A. R. Rahman Superhit Song : ए. आर. रहमान यांच्या 800 गाण्यांतील एक गाणं रातोरात सुपरहिट झालं होतं. विशेष म्हणजे आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं.
advertisement
1/7

म्युझिक इंडस्ट्रीत 'मोजार्ट ऑफ मद्रास' म्हणून ओळखले जाणारे ए. आर. रहमान यांनी आपल्या कारकिर्दीत 800 हून अधिक गाणी तयार केली आहेत. यातील 114 पेक्षा जास्त गाणी त्यांनी आपल्या मधुर आवाजात गायली आहेत. पण त्यांचं एक गाणं रेकॉर्ड होण्यापूर्वीच चित्रित करण्यात आलं होतं आणि ते रातोरात सुपरहिट झालं होतं.
advertisement
2/7
ए. आर. रहमान हे भारतीय संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्यांची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या त्या एका गाण्याची गोष्ट सांगणार आहोत, जे रेकॉर्ड होण्यापूर्वीच चित्रित झालं होतं आणि रातोरात लोकप्रिय झालं होतं. 11 वर्षांपूर्वी हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं होतं.
advertisement
3/7
इम्तियाद अली यांचा 'हायवे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. पण या चित्रपटातील 'पटाखा गुड्डी' हे गाणं रातोरात सुपरहिट झालं. हे गाणं नूरन सिस्टर्सने गायले होते. पण ए. आर. रहमान यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं आणि गीतकार इरशाद कामिल यांनी याचे बोल लिहिले होते. आजही हे गाणं अनेकांच्या ओठावर आहे. पण या गाण्यामागची गोष्ट खूप वेगळी आहे. हे फिल्म इंडस्ट्रीतील पहिलं असं गाणं होतं, जे रेकॉर्ड करण्यापूर्वीच चित्रित केले गेले.
advertisement
4/7
साधारणपणे गाणी आधी रेकॉर्ड केली जातात आणि नंतर चित्रित केली जातात. पण या गाण्याबरोबर तसे झाले नाही. इम्तियाज अली यांनी आधीच या गाण्याचे व्हिज्युअल शूट केले होते. त्यांनी लोकेशन, मूड आणि पात्रांच्या भावनांनुसार सीन तयार केला आणि नंतर ए. आर. रहमान यांना सांगितले की गाण्याचा माहौल कसा असावा. ही पद्धत हिंदी सिनेमात खूपच क्वचित दिसते. गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी चित्रित करण्यामागचे कारण म्हणजे इम्तियाज अली यांना गाण्यात खऱ्या प्रवासाची आणि निरागसतेची झलक दिसावी असे वाटत होते.
advertisement
5/7
विशेष म्हणजे शूटिंगच्या वेळी गाण्याची धूनही ठरलेली नव्हती. पण त्यांनी आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबत असे सीन शूट केले की त्यामध्ये स्वातंत्र्य आणि मोकळेपणा दिसून येतो. नंतर रहमान यांनी हे व्हिज्युअल पाहून गाण्याची धून आणि बोल तयार केले. त्यामुळेच या गाण्यात एक वेगळी ऊर्जा जाणवते. या गाण्याचे शूटिंग पंजाब आणि हरियाणाच्या सुंदर रस्त्यांवर झाले. शेती, रस्ते आणि ट्रकचा प्रवास या गोष्टींमुळे हे गाणं अधिक भावतं.
advertisement
6/7
इम्तियाज अली यांनी व्हिज्युअल आधी शूट केले आणि नंतर रहमान यांना सांगितले की ही भावना संगीतामध्ये उतरवा. हे गाणं आजही लोकांच्या प्रवासाचा साथीदार बनले आहे. 2014 मध्ये आलेल्या 'हायवे' या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले होते.
advertisement
7/7
'हायवे' हा चित्रपट साजिद नडियाडवाला यांच्या सहनिर्मितीत तयार करण्यात आला होता. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसले होते. सुमारे 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने भारतात 30.6 कोटी आणि जगभरात 52.4 कोटींची कमाई केली. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी लोक आवडीने ऐकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ए. आर. रहमानच्या 800 गाण्यांपैकी हे एक गाणं, रेकॉर्ड होण्यापूर्वीच रातोरात झालं सुपरहिट