Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy News : लग्नानंतर काही कालावधीने कपल्स प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतात. त्यावेळी प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संबंध ठेवायचे किंवा किती वेळा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा होते असे प्रश्न कित्येक कपल्सना पडतात. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/5

प्रत्येक महिन्याला एकदाच ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडतं. म्हणजे प्रत्येक सायकलमध्ये फक्त 4-5 दिवस असे असतात ज्यामध्ये प्रेग्नन्सीची शक्यता सगळ्यात जास्त असते.
advertisement
2/5
जर प्रजननसाठी अनुकूल असलेल्या काळात लैंगिक संबंध ठेवले तर दर महिन्याला प्रेग्नन्सीची शक्यता 15 ते 25 टक्के असते. ओव्हेल्युशेनच्या दोन दिवसाआधीपासून ते ओव्हेल्युशेनच्या दिवसापर्यंत जो प्रजननासाठी अनुकूल काळ असतो. तेव्हा दररोज किंवा एक दिवस सोडून ट्राय करा.
advertisement
3/5
आठवड्यातून 3-4 वेळा ट्राय करा जेणेकरून ओव्ह्युलेशनचे दिवस चुकणार नाही. ओव्हेल्युशन टेस्ट किट किंवा पीरियड ट्रॅकर अॅपच्या मदतीने प्रजनानासाठी अनुकूल असलेले दिवस समजून घ्या.
advertisement
4/5
सतत ट्राय केल्याने प्रेग्नन्सी लगेचच होतं असं नाही. एका हेल्दी कपललाही गर्भधारणा होण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात. जर एक वर्ष नियमित ट्राय करूनही प्रेग्नन्सी होत नसेल 6 महिने आणि वयही 35 पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.
advertisement
5/5
दिल्लीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?