TRENDING:

Best Horror Blockbuster : 2 कोटींची हॉरर फिल्म, 7 दिवसांतच कमावले 1600 कोटी! हलकं काळीज असणाऱ्यांनी चुकूनही पाहू नका

Last Updated:
Best OTT Horror Film : हॉरर सिनेमांच्या इतिहासात एक असा चित्रपट आहे, ज्याने अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनून, फक्त ७ दिवसांत तब्बल १६०० कोटी रुपये कमावले!
advertisement
1/7
2 कोटींमध्ये बनवली हॉरर फिल्म, 7 दिवसांतच कमावले 1600 कोटी!
मुंबई: तुम्हाला जर हॉरर सिनेमांची आवड असेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने 'जिगरबाज' असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनतात, पण त्यांची कमाई तितकी होत नाही. पण हॉरर सिनेमांच्या इतिहासात एक असा चित्रपट आहे, ज्याने अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनून, फक्त ७ दिवसांत तब्बल १६०० कोटी रुपये कमावले! 'पैरानॉर्मल ॲक्टिव्हिटी' नावाच्या या चित्रपटाने जगाला 'धडकी' भरवून इतिहास घडवला.
advertisement
2/7
२००७ साली प्रदर्शित झालेला 'पैरानॉर्मल ॲक्टिव्हिटी' हा एक 'सुपरनॅचरल थ्रिलर' चित्रपट आहे. ओरेन पेली यांनी या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सिनेमात मोठे स्टार्स नव्हते, मोठे भव्य सेट नव्हते, किंवा भडक ग्राफिक्सही नव्हते. फक्त एका कॅमेऱ्याने शूट केलेला हा सिनेमा! तरीही त्याने लाखो लोकांना घाबरवून सोडलं आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
advertisement
3/7
या चित्रपटात केटी फेदरस्टन आणि मिका स्लॉट यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिग्दर्शक ओरेन पेली यांची ही पहिलीच फिल्म होती. त्यांनी ती स्वतःच्या घरी शूट केली होती. लोकेशनचा खर्च नाही, जास्त तामझाम नाही, आणि कॅमेराही फक्त एकच! दिग्दर्शनापासून एडिटिंगपर्यंत सगळं त्यांनी स्वतःच सांभाळलं. सुरुवातीला तर या सिनेमाचं बजेट फक्त १२ लाख रुपये होतं, पण नंतर ते वाढून २ कोटींपर्यंत पोहोचलं.
advertisement
4/7
चित्रपटाचं बजेट वाढण्यामागे एक खास कारण आहे. प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना काही दृष्यं, विशेषतः क्लायमॅक्स पुन्हा शूट करायला सांगितला. यामुळे सिनेमाचं एकूण बजेट २ लाख १५ हजार डॉलर म्हणजेच सुमारे २ कोटी रुपये झालं.
advertisement
5/7
<strong>'मांगा तो मिलेगा!' - अनोखी मार्केटिंग आणि १६६० कोटींची कमाई! </strong>हा सिनेमा सुरुवातीला सगळ्या सिनेमागृहांत प्रदर्शित झाला नाही. कॉलेजच्या शहरांमध्ये तो आधी दाखवण्यात आला. ज्यांनी तो पाहिला, त्यांनी ऑनलाइन त्याच्याबद्दल चर्चा सुरू केली, 'वर्ड ऑफ माउथ' मार्केटिंग सुरू झाली. याच 'एक्साइटमेंट'चा फायदा निर्मात्यांनी घेतला. पॅरामाउंट पिक्चर्सने हळूहळू सिनेमागृहांची संख्या वाढवली. त्यांनी चाहत्यांना आवाहन केलं की, "जर तुम्हाला तुमच्या शहरात हा सिनेमा पाहायचा असेल, तर त्याची 'मागणी' करा!" ही एक अनोखी मार्केटिंग 'स्कीम' होती.
advertisement
6/7
शेवटी हा चित्रपट १९४५ सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आणि जगभरातून १९३ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे १६६० कोटी रुपये कमावून 'ब्लॉकबस्टर' ठरला. हॉरर चित्रपटांच्या इतिहासात हा एक नवा 'टर्निंग पॉईंट' होता. कमी बजेट असूनही त्याने 'सुपर से भी उपर' कमाई केली. जरी IMDb वर याला फक्त ६.३ रेटिंग मिळाली असली, तरी 'पैरानॉर्मल ॲक्टिव्हिटी'ने हॉरर चित्रपटांचा ट्रेंड बदलला. त्याने हे सिद्ध केलं की, घाबरवण्यासाठी किंवा हिट होण्यासाठी मोठ्या बजेटची गरज नसते.
advertisement
7/7
'पैरानॉर्मल ॲक्टिव्हिटी' (२००७) हा चित्रपट आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हॉरर सिनेमा पाहणारे चाहते याचा ओटीटीवर आनंद घेऊ शकतात, पण लक्षात ठेवा, हा सिनेमा खूपच 'धडकी भरवणारा' आहे आणि तुम्हाला तो 'बेचैन' करू शकतो!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Best Horror Blockbuster : 2 कोटींची हॉरर फिल्म, 7 दिवसांतच कमावले 1600 कोटी! हलकं काळीज असणाऱ्यांनी चुकूनही पाहू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल