TRENDING:

Salim Khan: सलीम खान यांना भेटायला 'भाईजान'च्या Ex GFs ची हॉस्पिटलमध्ये धाव, खचलेल्या सलमानला दिला आधार

Last Updated:
Salim Khan health update: बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. या कठीण काळात खान कुटुंबाला धीर देण्यासाठी सलमान खानच्या मैत्रिणींनी हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली आहे.
advertisement
1/9
सलीम खान यांना भेटायला भाईजानच्या Ex GFs ची गर्दी, खचलेल्या सलमानला दिला आधार
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज लेखक आणि खान घराण्याचे आधारस्तंभ सलीम खान सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्यावर तातडीने करण्यात आलेली 'DSA' प्रक्रिया यशस्वी झाली असून, ९० वर्षीय सलीम यांची प्रकृती आता स्थिर आहे.
advertisement
2/9
या कठीण काळात खान कुटुंबाला धीर देण्यासाठी जवळच्या सर्वच व्यक्तींनी रुग्णालयात धाव घेतली आहे. सलीम खान यांची प्रकृती खालावल्याचं समजताच, सलमानची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री संगीता बिजलानी तातडीने लीलावती रुग्णालयात पोहोचली.
advertisement
3/9
पापाराझींनी तिला रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट केलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि उदासी स्पष्टपणे जाणवत होती.
advertisement
4/9
एकेकाळी सलमान आणि संगीताच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, आजही खान कुटुंबाशी तिचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे.
advertisement
5/9
संगीतासोबतच प्रसिद्ध गायिका युलिया वंतूर ही देखील सलीम साहेबांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात हजर झाली.
advertisement
6/9
वडिलांवर यशस्वी उपचार झाल्याने सलमान, अरबाज आणि सोहेल यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण त्याचवेळी त्यांनी रुग्णालयाला एक कडक विनंतीही केली आहे.
advertisement
7/9
हॉस्पिटलबाहेर होणारी मीडियाची गर्दी आणि सततचे कॅमेरे पाहता, खान कुटुंबाने अधिकृत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे.
advertisement
8/9
आपल्या वडिलांना या वयात शांततेची गरज आहे आणि त्यांचा खासगीपणा जपला जावा, अशी कळकळ सलमानने व्यक्त केली आहे.
advertisement
9/9
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांची प्रकृती आता उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, पण त्यांची प्रकृती पाहता उद्या (गुरुवारी) सकाळी त्यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढलं जाण्याची दाट शक्यता आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salim Khan: सलीम खान यांना भेटायला 'भाईजान'च्या Ex GFs ची हॉस्पिटलमध्ये धाव, खचलेल्या सलमानला दिला आधार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल