Bharti Singh Health : प्रेग्नंट भारती सिंहला झालाय हा आजार, कुटुंबीय चिंतेत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bharti Singh Heath : भारती सिंह प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. अशातच आता कॉमेडियनच्या आजारपणामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत.
advertisement
1/7

प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंह सध्या आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याने भारती आणि तिचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत.
advertisement
2/7
भारती सिंहने लेटेस्ट व्लॉगमध्ये आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्लॉगमध्ये भारती म्हणाली,"सध्या मी संभ्रमात आहे कारण मी काहीही गोड पदार्थ खात नाही आहे. सकाळी फक्त एक कप चहा पिते. त्याव्यतिरिक्त काही नाही. पण तरीही साखरेचं प्रमाण का वाढतंय?".
advertisement
3/7
भारती सिंह म्हणाली,"हर्ष दुबईत गेला आहे. त्याच्या नसण्याने मी आणखी एकटी पडली आहे. मला रडू येतंय. मी कोणताही ताण घेत नाही. योग्य प्रमाणात डाएट सुरू आहे पण तरीही साखर का वाढतेय खरंच कळत नाही".
advertisement
4/7
भारती पुढे म्हणाली,"डाएटबाबतीत मी खूप स्ट्रिक्ट आहे. गहू वगैरे पण काही खात नाही आहे. पण तरीही असं काय होतंय काही कळेना. बाळावर याचा काही परिणाम होता कामा नये या गोष्टीची मला सर्वाधिक भीती आहे".
advertisement
5/7
भारती सिंह दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. याआधी तिने 'गोला'ला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन आपल्या कुटुंबियासमवेत स्विट्जरलँडला गेली होती. यावेळी अतिशय खास अंदाजात तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली.
advertisement
6/7
भारती सिंहची प्रकृती अस्थिर असूनही तिचं तिच्या कामावर लक्ष आहे. सर्व प्रोफेशनल कामं ती ठरलेल्या वेळी करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने 'लाफ्टर शेफ'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
advertisement
7/7
पहिल्या प्रेग्नंसीच्यावेळीही भारती सिंह काम करत होती. तसेच गोलाच्या जन्मानंतर काही दिवसांतच ती सेटवर पुन्हा हजर होती. भारती सिंह म्हणते,"मला काम करायला आवडतं. कामामुळे मी सकारात्मक राहते".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bharti Singh Health : प्रेग्नंट भारती सिंहला झालाय हा आजार, कुटुंबीय चिंतेत