मुंबईसह राज्यातील 11 जिल्ह्यात थंडीची लाट कायम, यादीत तुमचाही जिल्हा आहे का?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. मराठवाड्यातील सहा, उत्तर महाराष्ट्रातील चार तर विदर्भातील एका जिल्ह्याला हवामान विभागाने थंडाचा लाटेचा येलो अलर्ट दिला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांत शीत लहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात हवामान कसं असेल…
advertisement
1/6

2/6
मुंबईत देखील किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहिल. कोंकणातही थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
3/6
पुण्यात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एव्हढं राहिल. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात देखील गारठा वाढला आहे.
advertisement
4/6
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक मध्ये ८ तर जळगाव मध्ये ९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहणार आहे.
advertisement
5/6
मराठवाड्यातील ८ पैकी सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव वगळता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आला आहे.नांदेड मध्ये ९ तर संभाजीनगर मध्ये १० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहिल.
advertisement
6/6
विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहिलं. तर नागपुरमधे ११ तर अमरावतीत १२ अंश सेल्सिअस एव्हढं किमान तापमान राहिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबईसह राज्यातील 11 जिल्ह्यात थंडीची लाट कायम, यादीत तुमचाही जिल्हा आहे का?