Bigg Boss 19 घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 Latest Update : सलमान खानचा 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत असून लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेची तारिखदेखील समोर आली आहे.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम अर्थात Bigg Boss 19 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सलमानचा हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून नऊ आठवडे उलटले असून आता हा कार्यक्रम मध्यापर्यंत पोहोचला आहे.
advertisement
2/7
अशातच आता Bigg Boss 19 या बहुचर्चित कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेची तारीख समोर आली आहे. त्यामुळे बिग बॉसप्रेमींची कार्यक्रमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असल्याची शक्यता आहे. अद्याप याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावर तारीख लिक झाली आहे.
advertisement
4/7
दोन आठवड्यांसाठी 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम आणखी वाढवला जाऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आणखी 40 दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
advertisement
5/7
सूत्रांनुसार, पुढील महिन्यात शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळू शकते. म्हणजेच, जे प्रेक्षक विचार करत होते की आता गेम स्थिर झाला आहे, त्यांच्या साठी येणाऱ्या आठवड्यांमध्ये अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील.
advertisement
6/7
'बिग बॉस 19'मध्ये सध्या अभिषेक बजाज, अशनूर कौर, गौरव खन्ना, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांसारखे स्पर्धक आपल्या जबरदस्त खेळामुळे आणि उत्तम गेम स्टॅटर्जीमुळे चर्चेत आहेत.
advertisement
7/7
सोशल मीडियावर 'बिग बॉस 19'मधील स्पर्धकांची जोरदार चर्चा आहे. प्रत्येक आठवड्यातील शोमधील ट्विस्ट प्रेक्षकांना बांधून ठेवत आहेत. आता या आठवड्यात 'बिग बॉस 19'मधील कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 घेणार प्रेक्षकांचा निरोप; 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले