Bigg Boss 19: 27 वर्ष लपवलं, विवाहित गायकासोबत लिव्ह-इनमध्ये होती अभिनेत्री, बिग बॉसमध्ये केला शॉकिंग खुलासा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bigg Boss 19: बिग बॉस 19 ची स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉसमधील त्यांच्या परखड मतांमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. मात्र कधी काळी त्या त्यांच्या लव्ह लाइफमुळे खूप चर्चत राहिल्या.
advertisement
1/7

बिग बॉस 19 ची स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या खूप चर्चेत आहे. बिग बॉसमधील त्यांच्या परखड मतांमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. मात्र कधी काळी त्या त्यांच्या लव्ह लाइफमुळे खूप चर्चत राहिल्या.
advertisement
2/7
एक काळ असा होता जेव्हा कुनिका प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या प्रमात होत्या. कुमार सानू विवाहित असूनही कुनिकासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. या गोष्टीमुळे दोघेही सतत चर्चेत असत.
advertisement
3/7
गायक कुमार सानू आणि अभिनेत्री कुनिका सदानंद यांचं नातं अनेक वर्षं चर्चेत होतं, पण कुणीही याबद्दल उघड बोललं नव्हतं. आता बिग बॉस 19 मध्ये स्वतः कुनिकानेच या नात्याचं गुपित सांगितलं आणि सगळ्यांनाच धक्का दिला.
advertisement
4/7
कुनिकाने सांगितलं की ती तब्बल 27 वर्षं कुमार सानूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. हे नातं ती नेहमी लोकांपासून लपवत आली, पण आता ती खुलून बोलली. तिच्या म्हणण्यानुसार, ते दोघं एकत्र राहत होते, पण या काळात सानू दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनमध्ये गेला. इतकंच नाही तर त्याने हा प्रकार स्वतः कबूलही केला.
advertisement
5/7
कुनिकाने सांगितलं, "27 वर्षे मी हे मनात दाबून ठेवलं होतं. आज सांगितल्यावर मला हलकं वाटतंय. आम्ही पती-पत्नीसारखंच राहत होतो. पण एका टप्प्यावर त्याने माझ्या नाकाखाली दुसऱ्या महिलेला भेटायला सुरुवात केली. त्याने मला हे स्वतः सांगितलं."
advertisement
6/7
एका मुलाखतीतही तिने आधी कबूल केलं होतं की त्यांचं नातं साधारण सहा वर्षं खरं पती-पत्नीसारखं होतं. त्यांची जवळीक एका विचित्र प्रसंगातून झाली होती.
advertisement
7/7
एका पार्टीदरम्यान कुमार सानू खूप मद्यपान करून खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कुनिकाने त्याला समजावलं, थांबवलं आणि दोघे हळूहळू जवळ आले. त्यानंतर तो तिच्या शेजारी राहायला आला आणि दोघांचं नातं सुरू झालं. पण काही वर्षांनंतर दोघेही वेगळे झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19: 27 वर्ष लपवलं, विवाहित गायकासोबत लिव्ह-इनमध्ये होती अभिनेत्री, बिग बॉसमध्ये केला शॉकिंग खुलासा