Bigg Boss 19 मध्ये होणार या वाइल्ड कार्डची एन्ट्री, नेटवर्थ ऐकून व्हाल शॉक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'मध्ये या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस 19'चा फिनाले आता फक्त काही आठवड्यांवर आला आहे आणि शो आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचत असताना निर्माते एकापेक्षा एक असे ट्विस्ट घेऊन येत आहेत.
advertisement
2/7
'बिग बॉस 19'मध्ये आता एका नव्या वाइल्ड कार्डची एन्ट्री होणार आहे आणि ती कोणी सामान्य व्यक्ती नसून शार्क टँक इंडियाची प्रसिद्ध जज गजल अलघ (Ghazal Alagh) आहे.
advertisement
3/7
वीकेंड का वारच्या सेटवर गजल दिसल्याने ती बिग बॉस 19ची नवी वाइल्ड कार्ड स्पर्धक बनू शकते. जर असं झालं, तर नक्कीच घरात एक नवी ऊर्जा आणि स्मार्टनेसचा तडका लागणार आहे.
advertisement
4/7
गजल अलघ या एक यशस्वी व्यवसायिका आणि Mamaearth या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1988 रोजी हरियाणा येथे झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून बीसीए (BCA) पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी School of Visual Arts (न्यूयॉर्क) येथून मॉडर्न आर्ट आणि डिझाइनचे शिक्षण घेतले.
advertisement
5/7
गजल यांनी आपल्या करिअरची सुरुवात फक्त महिना 1200 रुपयांच्या पगारावर केली होती. जेव्हा त्या NIIT मध्ये कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करत होत्या. तिथे त्या आयटी कंपन्यांमधील इंजिनिअर्स आणि मॅनेजर्सना कोडिंग आणि सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देत असत. पण त्यांच्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकांमध्ये स्थान मिळवून दिले.
advertisement
6/7
गजल अलघ यांची नेट वर्थ सध्या सुमारे 1200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यांनी Mamaearth या ब्रँडला भारतातील टॉप स्किनकेअर आणि बेबी प्रॉडक्ट्स ब्रँड बनवले आहे. त्यांच्या पती वरुण अलघ हेही त्यांच्या बिझनेस पार्टनर आहेत.
advertisement
7/7
गजल खरंच 'बिग बॉस 19'च्या घरात एन्ट्री घेत असतील, तर हे पाहणे रंजक ठरेल की एक कॉर्पोरेट माइंडसेट असलेली ‘शार्क’ बिग बॉसचा खेळ कसा खेळते. त्या आपल्या रणनीतीने सगळ्यांना मागे टाकतील का, की घरातील नातेसंबंधच वादांचे कारण ठरतील? सध्या फॅन्स गजलच्या एन्ट्रीच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 मध्ये होणार या वाइल्ड कार्डची एन्ट्री, नेटवर्थ ऐकून व्हाल शॉक