'आधी सलमान भाईला विचार...', अश्नीर ग्रोव्हरला मिळाली BB19 ची ऑफर? थेट 'तो' स्क्रीनशॉट केला शेअर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ashneer Grover Bigg Boss 19 Wild Card Entry : सध्या ‘राईज अँड फॉल’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत असलेले उद्योजक अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांना मिळालेली ‘बिग बॉस १९’ ची ऑफर!
advertisement
1/8

मुंबई: ‘शार्क टँक इंडिया’ या शोमधून प्रसिद्धी मिळवलेले आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे उद्योजक अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे त्यांना मिळालेली ‘बिग बॉस १९’ ची ऑफर!
advertisement
2/8
अश्नीर ग्रोव्हर सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअ‍ॅलिटी शो होस्ट करत आहेत, पण अचानक त्यांना बिग बॉसच्या टीमकडून ‘वाईल्ड कार्ड एंट्री’ साठी ईमेल आला आणि त्यांनी यावर दिलेला रिप्लाय सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
3/8
शुक्रवारी, अश्नीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला. हा ईमेल कथितरित्या ‘बनिजे ग्रुप इंडिया’ कडून आला होता, ज्यात त्यांना ‘बिग बॉस १९’ मध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून येण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.
advertisement
4/8
या ईमेलची सत्यता अजून सिद्ध झाली नसली तरी, अश्नीर ग्रोव्हरने त्यावर दिलेला रिप्लाय फारच मजेदार होता. त्यांनी लिहिलं, “हाहा! सलमान भाई से पूछ ले!! मै तो फ्री हो जाऊंगा तब तक!” म्हणजेच, “सलमान खानला विचारा. मी तोपर्यंत फ्री होईन.” यासोबतच, अनेकांना पाठवलेला हा ईमेल पाहून त्यांनी गंमत करत लिहिलं, “हा ‘मेल मर्ज’ कुणाची तरी नोकरी खाणार!”
advertisement
5/8
अश्नीर ग्रोव्हर आणि सलमान खान यांच्यातील जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर अश्नीरचा हा रिप्लाय खूपच गमतीदार ठरला आहे. मागील वर्षी, ‘बिग बॉस १८’ मध्ये सलमान खानने गेस्ट म्हणून आलेल्या अश्नीर ग्रोव्हरला त्याच्या पूर्वीच्या काही वादग्रस्त वक्तव्यांसाठी जाहीरपणे फटकारले होते.
advertisement
6/8
या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा अश्नीरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एका स्पॉन्सर्ड जाहिरातीच्या शूटिंगवेळी सलमानच्या मॅनेजरने अश्नीरसोबत फोटो काढायला नकार दिला होता. या घटनेचा संदर्भ देत सलमानने ‘बिग बॉस १८’ मध्ये अश्नीरला सुनावलं होतं.
advertisement
7/8
सलमान खान म्हणाला होता, “मी नाही, पण तुमच्या टीमसोबत मीटिंग झाली होती. तुम्ही जे काही बोललात, ते चुकीचं होतं. तुम्ही असं चित्र निर्माण केलंत की, आम्ही तुम्हाला फसवले. ही आकडेवारी चुकीची आहे.” यानंतर अश्नीरने सलमानची माफी मागितली होती आणि त्यांचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
advertisement
8/8
आता ‘बिग बॉस १९’ च्या ऑफरवर अश्नीरने थेट सलमान खानला विचारण्याची अट घातल्याने, हा पंगा पुन्हा रंगणार की काय, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आधी सलमान भाईला विचार...', अश्नीर ग्रोव्हरला मिळाली BB19 ची ऑफर? थेट 'तो' स्क्रीनशॉट केला शेअर