Bigg Boss 19 Pranit More: महाराष्ट्र कार्ड बंद कर! प्रणित मोरेला सपोर्ट करणारी मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्यांनी धु-धु धूतलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Pranit More: 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने प्रणित मोरेला पाठिंबा देताच शिल्पाला नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
advertisement
1/8

मुंबई: सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा ७ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अमाला मलिक, फरहाना भाट, तान्या मित्तल, गौरव खन्ना आणि कॉमेडियन प्रणित मोरे हे टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत.
advertisement
2/8
अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत असताना, 'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने प्रणित मोरेला पाठिंबा देताच, सोशल मीडियावर प्रादेशिकतेवरून मोठा वाद पेटला आहे आणि शिल्पाला नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
advertisement
3/8
शिल्पा शिरोडकरने X वर एक पोस्ट शेअर करत प्रणित मोरेचे खूप कौतुक केले होते. तिने लिहिले, "माझ्यासाठी एकच निवड आहे @Rj_pranit. मला प्रामाणिकपणे वाटते की, त्याने कधीही खोटा मुखवटा घातला नाही; तो नेहमीच खरा होता. तो एक 'खरा नायक' आहे." असे म्हणत तिने चाहत्यांना प्रणितसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
advertisement
4/8
मात्र, शिल्पाच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी तिला 'मराठी कार्ड' वापरल्याबद्दल ट्रोल केले आणि प्रादेशिकतेला बाजूला ठेवून योग्य व्यक्तीला मत देण्याची मागणी केली.
advertisement
5/8
शिल्पाच्या पोस्टवर आलेल्या अनेक कमेंट्समध्ये गौरव खन्नाच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गौरव खन्नाच्या एका फॅन अकाऊंटने कमेंट करत लिहिले, "ओह, कारण तो मराठी आहे.. समजलं. तुमच्या प्रादेशिक संबंधांमुळे तुमचे आवडते स्पर्धक असू शकतात, पण आम्ही सर्वात योग्य विजेत्यावर लक्ष केंद्रित करत आहोत! प्रणित खरा असला तरी, गौरव खन्नाने सातत्यपूर्ण नैतिकता, रणनीती आणि प्रतिष्ठा राखून उत्कृष्ट खेळ केला आहे. त्याने कधीही शिवीगाळ केली नाही किंवा नाटक केले नाही. गौरव हाच विजेता होण्यास पात्र आहे!"
advertisement
6/8
दुसऱ्या एका युजरने थेट लिहिले, "बस कर महाराष्ट्र कार्ड! तू एकही एपिसोड पाहिला आहेस का? प्रणितने कोणतेही योगदान दिलेले नाही. कृपया प्रत्येक गोष्टीत धर्म किंवा प्रादेशिक ओळख ओढू नका. जो स्पर्धक पात्र आहे, त्याला पाठिंबा द्या!"
advertisement
7/8
आणखी एका युजरने म्हटले, "हे खूप लज्जास्पद आहे. मराठी-मुंबई फेव्हरिजम बंद करा. हे बिगबॉस आहे, कोणतंही प्रादेशिक वोट बँक गेम नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक ओळख मध्ये आणू नका."
advertisement
8/8
'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. हा सोहळा जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजल्यापासून आणि कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजल्यापासून पाहता येणार आहे. या अंतिम सोहळ्यामध्ये बाद झालेले स्पर्धक आणि इतर पाहुणेही परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss 19 Pranit More: महाराष्ट्र कार्ड बंद कर! प्रणित मोरेला सपोर्ट करणारी मराठी अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्यांनी धु-धु धूतलं