TRENDING:

सगळे म्हणतात साधाभोळा, पण सूरज चव्हाण निघाला येडा बनून पेढा खाणारा, अखेर त्यानेच दाखवला स्वत:चा खरा चेहरा

Last Updated:
Suraj Chavan Real Life Truth : बिग बॉस फेम सूरज चव्हाण साधाभोळा आहे असं सगळे म्हणत होते पण सूरज खऱ्या आयुष्यात येडा बनून पेढा खाणारा निघाला. त्याने स्वत:च सांगितलं.
advertisement
1/8
सगळे म्हणतात साधाभोळा,पण सूरज चव्हाण निघाला येडा बनून पेढा खाणारा, अखेर त्यानेच दाखवला स्वत:चा खरा चेहरा
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण. आधी टिकटॉक स्टार त्यानंतर रीलस्टार बनत सूरज चव्हाणने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
advertisement
2/8
बिग बॉस मराठी 5 मध्ये आल्यानंतर सूरज चव्हाणची एक वेगळी बाजू, एक वेगळा सूरज संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला. सूरज चव्हाण खूप साधा आहे, भोळा आहे असं सगळ्यांनी म्हटलं. पण तोच बिग बॉस मराठी 5 चा मास्टर माइंडही होता.
advertisement
3/8
सूरजच्या दिसण्यावरून, त्याच्या रील्सवरून त्याला अनेकदा ट्रोल केलं गेलं. तो खूप भोळा आहे असं म्हणत अनेकदा त्याची फसवणूक झाली. त्याला कमी लेखलं गेलं. पण खरंच सूरज चव्हाण भोळा आहे का? याचं उत्तर त्यानेच दिलं आहे.
advertisement
4/8
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सूरज चव्हाणने त्याच्या भोळ्या असण्याबाबत भाष्य केलं. सूरज चव्हाण म्हणाला, "येडे चाळे केले म्हणून इथपर्यंत आलो. येडे चाळे केल्याशिवाय फेमस होत नाही आणि लोक आपल्याला बघत नाहीत. येडे येडे म्हणतात पण येडा शहाण्यालाही मागे टाकून पुढे जातो आणि पेढा खातो तोपण देवाचा. मोदक."
advertisement
5/8
सूरज चव्हाण खरोखर भोळा आहे का? असं विचारलं असता सूरज म्हणाला, "मी नाटक करत नाही. मी खरोखर भोळा आहे. मी साधा सिंपल आहे. मी जमिनीवर आहे म्हणून स्टार आहे आणि अख्ख्यांच्या काळजात आहे."
advertisement
6/8
"खोटं कशाला बोलू. मला कळत नाही. वाचायला लिहायला येत नाही. माझ्या ध्यानात राहत नाहीत. भोळा म्हणजे शिव शंभोचा लेक आहे. बुद्धी नाही पण ज्ञान खूप आहे."
advertisement
7/8
बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने केदार शिंदे यांच्या झापुक झुपूक सिनेमात काम केलं. हा सिनेमा थिएटरमध्ये सप्शेल आपटला. पण सूरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर येण्याची संधी मिळाली.
advertisement
8/8
सूरज चव्हाणने डिसेंबर 2025 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी त्याने त्याचं घर बनवलं. आता नव्या घरात तो बायकोसोबत राहतोय. सूरज चव्हाणने त्याच्या मामाची मुलगी संजनाबरोबर लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सगळे म्हणतात साधाभोळा, पण सूरज चव्हाण निघाला येडा बनून पेढा खाणारा, अखेर त्यानेच दाखवला स्वत:चा खरा चेहरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल