TRENDING:

'लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं...', अंकिता वालावलकरने उघड केला सूरज चव्हाणचा मास्टरप्लॅन, सांगितल्या घरातल्या 'त्या' गोष्टी

Last Updated:
Ankita Walawalkar: सूरज चव्हाणची जवळची मैत्रीण,'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिने सूरजच्या खऱ्या गेमबद्दल असा काही खुलासा केला आहे, ज्याने चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
1/8
'लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं...', अंकिताने उघड केला सूरजचव्हाणचा मास्टरप्लॅन
मुंबई : 'बिग बॉस मराठी ५' संपून आता बराच काळ लोटला असला, तरी त्या सिझनच्या आठवणी आणि चर्चा अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. विशेषतः विजेता सूरज चव्हाण याने आपल्या साधेपणाने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली होती.
advertisement
2/8
मात्र, आता सूरजची जवळची मैत्रीण आणि 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिने सूरजच्या खऱ्या गेमबद्दल असा काही खुलासा केला आहे, ज्याने चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
3/8
"आम्ही त्याला दूधखुळा समजत होतो, पण तोच खरा मास्टरमाईंड होता," असं म्हणत अंकिताने बिग बॉसच्या घरातील पडद्यामागची समीकरणं मांडली आहेत.
advertisement
4/8
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने सूरज चव्हाणच्या खेळावर भाष्य केलं. ती म्हणाली, "घरात असताना आम्हाला असं वाटायचं की सूरजला गेम समजत नाहीये, त्याला कोणाची तरी मदतीची गरज आहे. पण खरं तर, आमच्या आधीच त्याला सगळा खेळ कळला होता. आम्ही ज्या रणनीतीचा विचार करत होतो, त्याही पलीकडे जाऊन तो विचार करत होता."
advertisement
5/8
अंकिता पुढे म्हणाली, "आम्हाला वाटलं आम्ही त्याला सांभाळतोय, पण उलट तोच आम्हाला त्याच्या तालावर नाचवत होता." अंकिताने पुढे स्पष्ट केलं की, सूरजने आपलं साधं रूप अशा प्रकारे वापरलं की समोरच्याला तो कधीच स्पर्धक वाटला नाही, आणि हीच त्याची सर्वात मोठी रणनीती होती.
advertisement
6/8
अंकिताने या मुलाखतीत एक अत्यंत कडू सत्य मांडलं. ती म्हणाली, "आजच्या काळात सोशल मीडियावर इमोशनल कंटेंट विकला जातो. जो माणूस स्वतःला बिचारा किंवा गरीब म्हणून प्रोजेक्ट करतो, त्याला लोकांची जास्त सहानुभूती मिळते. सूरजला हे खूप चांगलं कळलं होतं की प्रेक्षकांना काय द्यायचं आहे. सोशल मीडियावर जो बिचारा दिसतो, तो प्रत्यक्षात खूप चतुर असतो. त्याला माहीत असतं की लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं."
advertisement
7/8
बिग बॉसच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अंकिताने एक मागणी केली. ती म्हणाली, "जसं बिग बॉसच्या घरात जातीवर भाष्य करण्यावर बंदी आहे, तशीच परिस्थिती किंवा गरिबीवर बोलण्यावरही बंदी असायला हवी. तुमचा गेम खेळा, तुमचं टॅलेंट दाखवा, पण सहानुभूती मिळवण्यासाठी तुमच्या गरिबीचा वापर करू नका. खेळ हा खेळासारखाच व्हायला हवा, तिथे कोणाच्या परिस्थितीचा फायदा उठवू नये."
advertisement
8/8
अंकिताने स्वतःची चूक मान्य करताना सांगितलं की, ती कधीच बिग बॉस बघून गेली नव्हती, त्यामुळे तिला घरच्या राजकारणाचा अंदाज आला नाही. ती म्हणाली, "सूरजने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे खेळ खेळला. दिसायला तो साधा दिसायचा, पण आतून तो मास्टरमाईंड होता. आम्ही तिथे मूर्ख ठरलो आणि तो ट्रॉफी घेऊन गेला. असो, आता त्याचं लग्न झालंय आणि तो सुखी आहे, हे पाहून आनंद होतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं...', अंकिता वालावलकरने उघड केला सूरज चव्हाणचा मास्टरप्लॅन, सांगितल्या घरातल्या 'त्या' गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल