Suraj Chavhan : मनाला खूप लागलं! बड्या पुरस्कार सोहळ्यात 'सूरज चव्हाण', पण VIDEO पोस्ट करत व्यक्त केली नाराजी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Suraj Chavhan : एका पुरस्कार सोहळ्यात सूरज चव्हाणने 'स्वत:ला' पाहिल्यानंतर एक व्हिडीओ पोस्ट करत नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे.
advertisement
1/7

मराठी मनोरंजनसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'झी चित्र गौरव पुरस्कार' अलीकडेच मोठ्या थाटात पार पडला. या पुरस्काराला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. अनेक कलाकारांनी भन्नाट परफॉर्मन्स, स्किट सादर केले. त्यापैकीच एक परफॉर्मन्स म्हणजे सूरज चव्हाणचा.
advertisement
2/7
पुरस्कार सोहळा पाहिल्यानंतर सूरजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याने या सोहळ्यात आपली नक्कल पाहिली आणि त्याने नाराजी व्यक्त केली आहे. आपलं मन खूप दुखलं, आपल्या मनाला खूप लागलं असं सूरज चव्हाण म्हणला. त्याला आपली नक्कल आवडली पण त्याने एक खंत व्यक्त केली आहे.
advertisement
3/7
सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विजेता. सोशल मीडियावर झापूक झुपूक आणि बुक्कीत टेंगूळ अशा डायलॉगमुळे तो फेमस झाला. त्याच्या या डायलॉगची नक्कल कितीतरी लोक करतात. झी चित्र गौरव पुरस्कारातही बड्या कलाकारांनी त्याची नक्कल केली. पण सूरजने यानंतर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
4/7
सूरज म्हणाला, "झी मराठीवर एक कार्यक्रम झाला. झी चित्र गौरव. या कार्यक्रमात माझी एक्टिंग बघून मला आनंद झाला. त्यांनी एक नंबर कॅरेक्टर केला आहे सूरज चव्हाणचं. मलाही आनंद आहे, माझे फॅन पोट धरून हसतात खुदुखुदु. मला अभिमान आहे. ती खूप मोठी लोक आहेत.त्यांना मला काहीही बोलायचं नाही"
advertisement
5/7
"पण मला एक खंत आहे. माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली आहे की. एवढा मोठा शो आहे झी चित्र गौरव. पण मला बोलावलं नाही. त्यांच्याकडून कुठला कॉलही आला नाही. मला त्या कार्यक्रमाच्या कुठलातरी कोपऱ्यात बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं की किमान बोलावलं आहे. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. माझं मन इतकं दुखलं आहे की ते फक्त माझ्या मनाला माहिती. एकातरी बाजूला मी पाहिजे होतो कुठेतरी. एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही", असं तो म्हणाला.
advertisement
6/7
"फॅन लोकांनो ,मी तुम्हाला देव मानतो. तुमच्यामुळे मी मोठा स्टार आहे. हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांमुळे झालं आहे. माझ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगा, त्यांनी मला तिथे बोलवायला पाहिजे होतं की नाही? खरं सांगा माझ्या फॅन लोकांनो. तुम्ही माझे देव आहात. मी देव म्हणून काळजात ठेवलं तुम्हाला. तुमच्यासाठी तरी त्यांनी मला बोलवायला हवं होतं की नाही?" असा सवालही त्याने केला आहे.
advertisement
7/7
दरम्यान सूरजच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला सपोर्ट केलाय. हो तुला बोलवायला हवं होतं. पण तू ओरीजीनल व्यक्ती आहेस, त्यामुळे तुझीच नक्कल होणार, काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणत त्याच्या चाहत्यांनी त्याची समजूत काढली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavhan : मनाला खूप लागलं! बड्या पुरस्कार सोहळ्यात 'सूरज चव्हाण', पण VIDEO पोस्ट करत व्यक्त केली नाराजी