TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : प्रभू शेळके 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर; छोटा डॉनने आधीच केलाय मोठा प्लॅन

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून प्रभू शेळकेचं एव्हिक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रभूने आधीच तयारीही करून ठेवली आहे.
advertisement
1/7
प्रभू शेळके Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर; छोटा डॉनने आधीच केलाय मोठा प्लॅन
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याची धाकधूक सगळ्यांना लागली आहे. अखेर त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे. छोटा डॉन प्रभू शेळके घराबाहेर पडल्याची चर्चा आहे.
advertisement
2/7
या आठवड्यात 10 पैकी एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारांडे आणि संकेत पाठक यांचा समावेश होता.
advertisement
3/7
या आठवड्यात दिपाली किंवा सागर घराबाहेर जाईल अशी चर्चा होती. पण प्रभू शेळकेचं एव्हिक्शन झालं आहे. त्यामुळे काटा ग्रुपसाठी हा मोठा धक्का आहे.
advertisement
4/7
पण छोटा डॉनला तुम्ही साधं समजून नका. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर काय करणार याचा मोठा प्लॅन त्याने आधीच करून ठेवला आहे.
advertisement
5/7
एकदा रेवासोबत बोलत असताना प्रभू शेळकेने आपला हा प्लॅन सांगितला होता. प्रभू सांगतो, "जर मला बिग बॉस कन्नडमधून ऑफर आली तर आपण तिकडे जाणार". यावर रेवा त्याला कन्नड बोलायला सांगते आणि तो बोलूनही दाखवतो, त्याचा अर्थही तो रेवाला सांगतो.
advertisement
6/7
याआधी प्रभूला घरातील सदस्यांनी घरातील कोणती वस्तू घेऊन जाणार असं विचारलं असात त्याने घरातील कॅमेरा आपल्याला आठवण म्हणून आपल्यासोबत न्यायाचा आहे, असं सांगितलं होतं.
advertisement
7/7
दरम्यान प्रभू शेळकेची तुलना आधीच्या बिग बॉस मराठी 5 चा विजेता.  सूरज चव्हाणशी केली जाते. दोघंही गरीब कुटुंबातील सोशल मीडिया स्टार. प्रभूनेही सूरजप्रमाणेच 'आधी उपचार, मग करिअर त्यानंतर लग्न', असं ठरवलं आहे. तो 'थॅलेसेमिया'सारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे. पण बिग बॉसच्या घरात प्रभूचा सिम्पथी गेमही फिका पडलेला दिसतो आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : प्रभू शेळके 'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर; छोटा डॉनने आधीच केलाय मोठा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल