आलिशान हॉटेलसारखा फिल अन् चमचमीत खाण्याची मजा, मुंबई-पुणे Deccan Queen ला नवा डायनिंग डबा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई पुणे रोज अप डाउन करणारेही बरेच आहेत. मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला जाताना आता आरामदायी प्रवासासोबतच स्वादिष्ट खाण्याचा अनुभवही ट्रेनमध्ये घेता येणार आहे.
advertisement
1/6

मुंबई पुणे रोज अप डाउन करणारेही बरेच आहेत. मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला जाताना आता आरामदायी प्रवासासोबतच स्वादिष्ट खाण्याचा अनुभवही ट्रेनमध्ये घेता येणार आहे. दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनला एक नवीन डब जोडण्यात आला आहे.
advertisement
2/6
अवघ्या साडेतीन ते चार तासांच्या प्रवासासाठी डेक्कन क्वीनला एक नवीन डबा जोडला असून यामध्ये आरामशीर बसून खाता येणार आहे. अगदी हॉटेलचा फिल तुम्हाला या डब्यात मिळणार आहे. रोज कामावरून थकून घरी जाणाऱ्यांसाठी ही सोय उत्तम असल्याचं ग्राहकांनी म्हटलं आहे.
advertisement
3/6
खुर्च्यांऐवजी सोफा पद्धतीनं आसन व्यवस्था या डब्यात करण्यात आली आहे. डब्याला वारली पेंटिंग करून त्याची शोभा वाढवण्यात आली आहे. अत्यंत सुंदर आकर्षक डिझाइन या डब्याला करण्यात आलं आहे. 1930 रोजीच्या काही जुन्या आठवणी सांगणारे फोटो देखील इथे लावण्यात आले आहेत.
advertisement
4/6
डायनिंग डबा असलेली ही एकमेव गाडी आहे. याला पॅन्ट्री कारने जोडण्यात आलं आहे. प्रवासासोबत चमचमीत पदार्थ निवांत बसून खाण्याचा आनंद घेता येणार आहे. शुक्रवारी डायनिंगचा डबा असलेली ट्रेन पहिल्यांदा मुंबईहून पुण्याकडे रवाना झाली.
advertisement
5/6
वारली चित्र, जुन्या आठवणी आणि खाद्याचे चवीष्ट पदार्थ असा कॉम्बो तुम्हाला इथे मिळणार आहे. हॉटेलसारखा फिल तुम्हाला या प्रवासात मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांनीही यालला भरभरून पसंती दिली आहे.
advertisement
6/6
डेक्कन क्विन ही भारतातील एकमेव अशी ट्रेन आहे, ज्या ट्रेन मधून प्रवास करताना आपण डायनिंग कार, म्हणजेच होटल सारख्या डब्यात बसून चविष्ट पदार्थ खात खात प्रवास करू शकतो, मुंबई आणि पुणेकर या एक्सप्रेसला लाडाने दख्खनची राणी देखील बोलतात, याच डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा ट्रेन महोत्सव मध्य रेल्वे साजरा करत आहे अशी माहिती स्वप्निल नीला मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
आलिशान हॉटेलसारखा फिल अन् चमचमीत खाण्याची मजा, मुंबई-पुणे Deccan Queen ला नवा डायनिंग डबा