हे प्रभू! Bigg Boss Marathi 6 च्या घरातील सगळ्यात महत्त्वाच्या वस्तूवर छोट्या डॉनचा डोळा; मारणार 'डल्ला'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस घरातून काही सोबत न्यायचं असेल तर काय घेऊन जाणार यावर सदस्यांचं बोलणं चालू होतं, तेव्हा छोटा डॉन प्रभू शेळकेने बिग बॉसच्या घरातील मोठ्या वस्तूवर दावा सांगितला.
advertisement
1/5

बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये ग्लॅमरस चेहऱ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा चेहरा म्हणजे प्रभू शेळके जो छोटा डॉन म्हणून ओळखला जातो. बिग बॉसच्या घरात तो त्याच्या अंतरंगी करामतीमुळेही चर्चेत असतो.
advertisement
2/5
एकदा भाऊच्या धक्क्यावर प्रभूने चंद्रा गाण्यावर डान्स करताना हटके स्टेपने रितेश देशमुखसह सगळ्यांंचं लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा तो अशाच अतरंगी गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. प्रभू शेळकेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात बिग बिग बॉसच्या घरातील एका महत्त्वाच्या वस्तूवर त्याचा डोळा असल्याचं दिसून येत.
advertisement
3/5
बिग बॉसच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये घरातील काही सदस्य एकत्र बसलेले आहेत. तेव्हा राकेश बापट त्यांना विचारतो की जर बिग बॉसच्या घरातून काही न्यायचं असेल तर कोण काय काय घेऊन जाणार?
advertisement
4/5
तेव्हा प्रभू सांगतो मी एक कॅमेरा घेऊन जाणार. यावर राकेश त्याला म्हणतो, अरे त्यांना पुढचा सीझनपण करायचा आहे. यावर प्रभू म्हणतो, आठवण म्हणून मी तो कॅमेरा माझ्या घराबाहेर लावेन.
advertisement
5/5
यावर राकेश त्याला सांगतो की अरे तो सीसीटीव्ही कॅमेरा नाही. यानंतर प्रभू म्हणतो मग मी ती गरम करायची मशीन घेऊन जाणार आणि अंडीही सोबत नेणार.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हे प्रभू! Bigg Boss Marathi 6 च्या घरातील सगळ्यात महत्त्वाच्या वस्तूवर छोट्या डॉनचा डोळा; मारणार 'डल्ला'