Ikkis Teaser: 29 वर्षांनंतर सनी देओल- अक्षय खन्ना एकत्र, 'इक्का'च्या टीझरवर फॅन्सकडून कमेंट्सचा पाऊस
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सनी देओल आणि अक्षय खन्नाच्या ‘इक्का’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच, चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सध्या चाहते कमेंट करत सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयाचे कौतुक करत आहेत.
advertisement
1/8

सनी देओल 'बॉर्डर 2' मुळे तर अक्षय खन्ना 'छावा' आणि 'धुरंधर' मुळे सध्या बॉक्स ऑफिसवर कमालीचे चर्चेत आहेत. सनी आणि अक्षयने बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता 'नेटफ्लिक्स' या ओटीटीवर एक नवीन चित्रपट रिलीज होणार आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर रिलीज झाला असून या टीझरची चांगलीच चर्चा होत आहे.
advertisement
2/8
'इक्का' (Ikka) चित्रपटातून अक्षय आणि सनी दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'नेटफ्लिक्स'कडून मंगळवारी मुंबईमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करून अनेक चित्रपट आणि वेबसीरीजची घोषणा करण्यात आली.
advertisement
3/8
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘इक्का’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये प्रेक्षकांना कोर्टरूम ड्रामा, थ्रिलर आणि इमोशनल स्टोरी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्याकडे असून चित्रपटाची निर्मिती सपना मल्होत्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याजवळ आहे.
advertisement
4/8
‘इक्का’ चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 29 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर अक्षय खन्ना आणि सनी देओल पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येत आहेत. याआधी त्यांनी १९९७ मधील जे.पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ (Border) या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांन एकत्र काम केलं होतं. ‘बॉर्डर’मध्ये त्यांनी युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या भूमिका केल्या होत्या, तर ‘इक्का’मध्ये ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले पाहायला मिळतील.
advertisement
5/8
‘इक्का’चा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. चाहत्यांकडून सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि दमदार अभिनयाचे कौतुक केले जात आहे. एक युजर म्हणतो,"तारा सिंग आणि रहमान डकैतचा क्रॉसओव्हर," तर आणखी एक युजर म्हणतो, "केव्हा वाटलं नव्हतं, नेटफ्लिक्स सनी आणि अक्षयला एकत्र आणेल."
advertisement
6/8
आणखी एका युजरने कमेंट केली की, "सनी देओल विरुद्ध अक्षय खन्ना, किती छान कोलेब्रेशन आहे", तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, "तारा सिंगने रेहमान डकैतला एका फटक्यातच गार केलंय." अनेक युजर्सने इन्स्टाग्रामवर सनी देओलच्या कामाचं कौतुक केलं आहे. सनी देओल 'बॉर्डर 2'मुळे कमालीचा चर्चेत आहे. अभिनेता आपल्या चित्रपटाचं सक्सेस एन्जॉय करतोय.
advertisement
7/8
टीझर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, "निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी. पण कायदा दोषी शोधू शकतो का? प्रसिद्ध डिफेंस लॉयर सिकंदर मेहरा, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा नैतिक निर्णय घेतात." या कॅप्शनवरून स्पष्ट होते की "इक्का" हा चित्रपट केवळ कोर्टरूम ड्रामा नाही तर नैतिकता आणि सत्यासाठीची एक लढाई आहे. चित्रपटाचे कथानक इमोशनल स्टोरी आहे. अक्षय खन्ना आणि सनी देओलमध्ये कशा पद्धतीने जुंपते, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
advertisement
8/8
‘इक्का’ चित्रपटामध्ये कलाकारांची मांदियाळी आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यासह दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शेख आणि आकांक्षा रंजन कपूर या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ikkis Teaser: 29 वर्षांनंतर सनी देओल- अक्षय खन्ना एकत्र, 'इक्का'च्या टीझरवर फॅन्सकडून कमेंट्सचा पाऊस