पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर २१ तासानंतरही वाहतूक कोंडी, ५० किमीपर्यंत रांगा, चालक-प्रवासी भुकेने व्याकूळ, रुग्णांचे हाल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Mumbai Road Traffic New Update: पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा परिसरात प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या २१ तासांपासून वाहतूक खोळंबली आहे.
advertisement
1/7

पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरमधून गॅस लिकेज होऊ लागला. त्यामुळे एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.
advertisement
2/7
आडोशी बोगदा परिसरात प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत ही पन्नास किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
3/7
आता तब्बल २१ तास झाले तरी वाहतूक सुरू झाली नसल्याने अनेक वाहनचालक या वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत. या वाहनचालकांना लोणावळा शहर पोलिसांकडून पाणी तसेच वडापाव देण्यात येत आहेत.
advertisement
4/7
या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींना विमानतळावर पोहोचायचे आहे. काहींना दवाखान्यामध्ये ट्रिटमेंट घेण्यासाठी पोहोचायचे आहे. तर काहींना आपला माल मुंबई विमानतळावर पोहोचवायचा आहे. मात्र या सर्वांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
advertisement
5/7
कालपासून हे वाहनचालक या वाहतूक कोंडीमध्ये असल्याने लोणावळा पोलिसांकडून पाणी आणि वडापाव वाटप करून माणूसकीचे दर्शन घडविण्यात आले.
advertisement
6/7
गॅस गळतीचे प्रमाण नियंत्रणात येईपर्यंत आणि महामार्ग पूर्ववत सुरू होईपर्यंत वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ताम्हिणी घाट मार्गे मुंबई तसेच कर्जत मार्गे ठाणे या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
7/7
एनडीआरएफ टीम, हेल्प फाउंडेशन तसेच बीपीएल टीम घटनास्थळी कार्यरत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक कोंडी आणखी काही तास कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर २१ तासानंतरही वाहतूक कोंडी, ५० किमीपर्यंत रांगा, चालक-प्रवासी भुकेने व्याकूळ, रुग्णांचे हाल