TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : नाही नाही म्हणता म्हणता झालंच! राकेशने अखेर राखीसोबत 'बिग बॉस'च्या घरातच केलं लग्न

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Raqesh Bapat : गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी 6 च्या घरात चर्चेत असलेली जोडी राकेश आणि राखी यांचा बिग बॉसच्या घरात विवाहसोहळा पार पडला आहे.
advertisement
1/7
नाही नाही म्हणता म्हणता झालंच! राकेशने अखेर राखीशी 'बिग बॉस'च्या घरातच केलं लग्न
बिग बॉस मराठी 6 च्या घरात गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि राकेश बापट यांच्या जोडीची चर्चा होते आहे. घरात दोघांवरून चिडवाचिडवी झाली आणि राखीने ते सीरिअसलीच घेतलं.
advertisement
2/7
राखी हात धुवून राकेशच्या मागे लागल्याचं दिसलं. ती त्याच्यासोबत फ्लर्ट करत होती. पण राकेश मात्र तिला सतत नाकारत होता.
advertisement
3/7
डान्स करताना राकेशने तन्वीला किस केलं तेव्हा राखी खूप भडकली. राकेशमुळे दुखावलेल्या राखीने स्वत:लाच शिक्षा दिली तिने आपले केस आपल्या हातांनी कापले आणि ती ढसाढसा रडली.
advertisement
4/7
आता मात्र नाही म्हणता म्हणता राकेशने चक्क राखीसोबत थेट लग्नच केलं आहे. दोघांनीही बिग बॉसच्या घरातच एकमेकांना घालत लग्न केलं. भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोत राखी आणि राकेशचं लग्न दाखवण्यात आलं आहे.
advertisement
5/7
राखीच्या हातात दोन हार आहेत. रितेश राखीला विचारतो, "राखी हा हार कुणाच्या गळ्यात घालणार?" यावर राखी लगेच राकेशचं नाव घेते. रितेश म्हणतो, "जीत जरी तुमची असली तरी हार त्यांचीच आहे"
advertisement
6/7
राकेश आधी डोक्याला हात लावतो. पण नंतर मात्र तो नाचत राखीजवळ येतो आणि दोघंही एकमेकांना हार घालतात.
advertisement
7/7
यानंतर रितेश राखीला "तुमची कपटी नणंद कोण आहे?, असं विचारतो. तेव्हा राखी तन्वी असं सांगते. शेवटी घरातील सगळे सदस्य वरातीत नाचतात आणि शेवटी फॅमिली फोटोही काढतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : नाही नाही म्हणता म्हणता झालंच! राकेशने अखेर राखीसोबत 'बिग बॉस'च्या घरातच केलं लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल