इथं हात लावला! Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'लिमिट क्रॉस'; प्रेक्षकही म्हणाले, 'आता घराबाहेर काढा'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Rakhi Reva : बिग बॉस मराठी 6 च्या घरात असं काही घडलं आहे की फुल्ल राडा झाला आहे. हे प्रेक्षकांनीही आवडलेलं नाही आणि त्यांनीही त्या सदस्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे.
advertisement
1/7

बिग बॉसचं घर म्हणजे वाद, भांडणं आलीच. पण आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात मात्र फुल्ल राडा पाहायला मिळाला. हात लावण्यावरून हा वाद झाला. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीही आता लिमिट क्रॉस झाली, घराबाहेर काढा अशी मागणी होऊ लागली आहे.
advertisement
2/7
नेमकं बिग बॉसच्या घरात असं घडलं तरी काय? हे पाहण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तर सुरुवात झाली ती रेवा आणि राखी यांच्या भांडणापासून.
advertisement
3/7
सुरुवातीला रेवा बसलेली आणि तिच्यासमोर राखी उभी असलेली दिसते. राखी रेवासमोर तोंड करून बोलते जळू नका माझ्या मेकअपवर. यानंतर पुढे ती मच्छर अशी हाक मारताना दिसते.
advertisement
4/7
राखीचं हे वागणं पाहून रेवा म्हणते ही काय नॉन्सेनगिरी आहे. यावर राखीची ओ माय गॉड अशी प्रतिक्रिया आलेली ऐकायला मिळते. पुढे राखी रेवाला तुझा चेहरा बघ किती घाण दिसतोय. एवढे मोठे मोठे पिंपल्स. यानंतर रेवाचा पारा चढतो. ती राखीला तू कोणत्या लेव्हलला पोक करतेस असं विचारते.
advertisement
5/7
नंतर राखी रेवामध्ये हाणामारीच होताना दिसते. राखी रेवाच्या छातीवर मारून तिला ढकलते आणि म्हणते तिने मला इथं हात लावला. मला हात लावू नको, मला हात लावू नको असंही राखी मोठ्याने ओरडते.
advertisement
6/7
राखी आणि रेवातील वाद विकोपाला गेल्याचं पाहताच घरातील सगळे सदस्य जमा होतात आणि त्यांच्या मधे पडतात. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
advertisement
7/7
रेवा आणि राखीत गेल्या काही दिवसांपासून असा वाद सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने चहात वांगं टाकलं तेव्हा आणि नंतर तिने रेवाचे कपडे फाटले तेव्हाही त्यांच्यात वाद झाला. पण आता मात्र वादाने रौद्र रूप धारण केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
इथं हात लावला! Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'लिमिट क्रॉस'; प्रेक्षकही म्हणाले, 'आता घराबाहेर काढा'