TRENDING:

Bigg Boss Marathi 6 संपण्याआधीच तन्वी कोलते बनली 'विनर'; जिंकलं प्रेक्षकांचं मन, भरभरून कौतुक

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील धाकड गर्ल तन्वी कोलतेला अनेकांनी ट्रोल केलं आहे. पण आता मात्र तिचं एक कृत्य पाहून जवळपास सगळ्या प्रेक्षकांनी तिचं कौतुक केलं आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 संपण्याआधीच तन्वी कोलते बनली 'विनर'; जिंकलं प्रेक्षकांचं मन, भरभरून कौतुक
कोलते, बोलते, सोलते... अशी ओळख असलेली तन्वी... जी बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील धाकड गर्ल आहे. टास्क असो वा कॅप्टन्सीची जबाबदारी रितेश देशमुखनेही तिचं किती तरी वेळा कौतुक केलं आहे.
advertisement
2/7
बिग बॉसचं घर म्हणजे वाद, भांडणं, स्पर्धा. इथं किती तरी लोक नातीही फक्त फायद्यासाठी जोडतात. पण तन्वीचं मात्र तसं नाही.
advertisement
3/7
तन्वीने प्रभूशी बहिणीचं नातं जोडलं आणि ते ती पदोपदी निभावताना दिसते. यासाठी घरातील सदस्य असो वा प्रेक्षक यांनी तिला ट्रोलही केलं आहे.
advertisement
4/7
पण आता मात्र तन्वीने असं काही केलं आहे की प्रेक्षकांचं मनही तिने जिंकलं आहे. तिला नावं ठेवणारे, तिला ट्रोल करणारे प्रेक्षकही तिलाच विनर ठरवून मोकळे झाले आहेत.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
5/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यात घरातील सदस्यांच्या खऱ्या कुटुंबातील सदस्य त्यांना भेटायला आले आहेत.
advertisement
6/7
तन्वी भाऊ मानत असलेल्या प्रभूचे आईबाबा आणि त्याचा भाऊ भेटायला आला. तेव्हा तन्वीने त्याच्या आईला आपली साडी दिली.
advertisement
7/7
तन्वीचा हा दिलदारपणा सगळ्यांना आवडला आहे. जवळपास सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तन्वीकडे माणुसकी आहे, तीच खरी बिग बॉसची विजेती आहे, अशा कमेंट यावर येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 संपण्याआधीच तन्वी कोलते बनली 'विनर'; जिंकलं प्रेक्षकांचं मन, भरभरून कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल