'बिग बॉस मराठी'च्या टीमकडून प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारची फसवणूक? व्हिडीओ शेअर करत केलेत गंभीर आरोप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या टीमकडून प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ शेअर करत या सोशल मीडिया स्टारने 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
1/7

प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या 'बिग बॉस मराठी सीझन 6'ची अखेर आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान यंदाच्या सीझनमध्ये कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी 6'च्या पर्वात अनेक मराठी-हिंदी कलाकार तसेच सोशल मीडिया स्टार्स यांना स्पर्धक म्हणून बोलावण्यात येत आहे. दरम्यान प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार महेश मोटे यांनादेखील 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वासाठी बोलावलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
3/7
महेश मोटे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते 'बिग बॉस मराठी'च्या आयोजकांवर फसवणूक केली असल्याचा आरोप करताना दिसत आहेत.
advertisement
4/7
गेल्या महिनाभरापासून बिग बॉसचे आयोजक महेश मोटे यांच्या संपर्कात होते. मात्र अचानक पणे त्यांना डावलल गेल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.
advertisement
5/7
"मुंबईला येण्याचा स्वतःचा खर्च केला. गेला महिनाभर त्यांनी मला भ्रमात ठेवलं आणि मानसिक त्रास दिला " म्हणत महेश मोटे यांनी 'बिग बॉस मराठी'च्या आयोजकांनाच धारेवर धरलं आहे.
advertisement
6/7
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या आयोजकांनी दोन महिने माझा वेळ घेतला होता. आता त्यांनी या गोष्टीचा मोबदला दिला पाहिजे.
advertisement
7/7
महेश मोटे यांना शेवटच्या क्षणी 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सिलेक्शन न झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस मराठी'च्या टीमकडून प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारची फसवणूक? व्हिडीओ शेअर करत केलेत गंभीर आरोप