TRENDING:

Bigg Boss Marathi 6 मधील सगळ्यात बेकार कॅप्टन; 'भाऊचा धक्का'वर रितेशने नावच जाहीर केलं

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Captain : बिग बॉस मराठी 6 मध्ये विजेता कोण होईल ते फिनालेला समजेल. पण त्याआधीच सगळ्यात बेकार कॅप्टनचं नाव मात्र रितेशने जाहीर केलं आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 मधील सगळ्यात बेकार कॅप्टन; 'भाऊचा धक्का'वर रितेशने नावच जाहीर केलं
बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्याला कॅप्टन्सीचा टास्क होतो आणि प्रत्येक आठवड्याला एक नवा कॅप्टन असतो. बिग बॉस मराठी 6 च्या घरातही आजवर अनेक कॅप्टन झालेत.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्कावर रितेशने काही कॅप्टन्सच्या कॅप्टन्सीचं त्यांच्या गेमचं कौतुक केलं आहे. आता पहिल्यांदाच त्याने एक असा कॅप्टन जो या सीझनचा सगळ्यात बेकार कॅप्टन असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
3/7
रितेश त्या सदस्याला म्हणतो, "मी तुम्हाला गेल्यावेळी म्हणालो होतो की तुम्ही एंटरटेन्मेंटचा कम्प्लेट पॅकेज आहात. कारण गेल्या आठवड्यात तुम्ही जो गेम खेळत होता, त्यात भांडणं होती, मजामस्ती होती. तुम्हाला बघायला ना एक गंमत वाटत होती. पण यावेळेला खरंच तुम्ही गोंधळ घातलात"
advertisement
4/7
रितेश पुढे सांगतो, "महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॅप्टन होता. कॅप्टन म्हणजे जबाबदारी, घरातील प्रमुख. पण सध्याच्या घडीला सगळ्याच कॅप्टनची तुलना केली तर तुम्ही या सीझनमधील सगळ्यात बेकार कॅप्टन आहात"
advertisement
5/7
बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यातील कॅप्टन आहे तो म्हणजे संकेत पाठक. त्याआधी राखी सावंत कॅप्टन होती. याशिवाय तन्वी, अनुश्री असे बाकीचे सदस्यही कॅप्टन होऊन गेले आहेत. मग आता यांच्यातील बेकार कॅप्टन कोण?
advertisement
6/7
तर ती आहे राखी सावंत. बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्काचा प्रोमोत रितेश राखीला या सीझनमधील सगळ्यात बेकार कॅप्टन असं म्हणताना दिसतो.
advertisement
7/7
दरम्यान याआधी रितेशने तन्वीच्या कॅप्टन्सी आणि टास्कमधील तिच्या कामगिरीचं कौतुक केलं होते. तन्वीला टास्क क्वीन म्हटलं होतं. तसंच तन्वी आणि अनुश्री या दोघींना स्ट्राँग खेळाडू म्हटलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 मधील सगळ्यात बेकार कॅप्टन; 'भाऊचा धक्का'वर रितेशने नावच जाहीर केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल