'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 9 ऐवजी 8 वाजता दाखवणार, का बदलली वेळ, कारण तुम्हाला माहित आहे का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी सीझन 6' हा कार्यक्रम आज 11 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. पण यंदा या सीझनची वेळ बदलली आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं दार 11 जानेवारी 2025 पासून उघडलं जाणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त सरप्राईजने भरलेला यंदाचा सीझन पाहायला 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत.
advertisement
2/7
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन प्रेक्षकांना 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येईल. त्यामुळे पुढचे 100 दिवस प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी'चे आतापर्यंत पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सर्वच सीझनने प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं. पण हे पाचही सीझन प्रेक्षकांना रात्री 9 वाजता पाहायला मिळत होते. पण यंदा सहाव्या सीझनच्या दरम्यान मात्र 'बिग बॉस मराठी'च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
advertisement
4/7
'दार उघडणार... नशिबाचा गेम पालटणार' अशी यंदाच्या सीझनची थीम आहे. यंदादेखील वेगवेगळ्या स्वभावाचे स्पर्धक प्रेक्षकांना घरात पाहायला मिळणार आहेत. नवीन सदस्य, नवं घर, नवे स्पर्धक, नवीन सीझन आणि नवी वेळ अशा सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये या सीझनची चांगलीच उत्सुकता आहे.
advertisement
5/7
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची वेळ बदलण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. Executive Vice President, Marathi Cluster, सतीश राजवाडे म्हणाले,"बिग बॉस' गेल्यावर्षी जेवढा प्रसारित केला जायचा तेवढाच वेळ यावर्षीसुद्धा दाखवला जाईल".
advertisement
6/7
सतीश राजवाडे पुढे म्हणाले,"बिग बॉस मराठी'चा शो यावेळी रात्री आठ वाजता प्रसारित करण्याचं कारण सुद्धा असंच आहे की, लोकांना शो लवकर पाहता यावा. कधीही प्रेक्षकांना असं वाटायला नको की अरे मला आज बघता येणार नाही, लवकर झोपायला उशीर होतोय वगैरे. म्हणून लवकर प्रसारणाची वेळ निश्चित केली गेली आहे".
advertisement
7/7
पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करेल या दृष्टीकोनातून वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सतीश राजवाडे म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 9 ऐवजी 8 वाजता दाखवणार, का बदलली वेळ, कारण तुम्हाला माहित आहे का?