Janhvi Kapoor : BF च्या आजीचे धरले पाय, आजीने दिली गोड पप्पी, सासरच्या मंडळींसोबत जान्हवी कपूरचे खास क्षण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Janhvi Kapoor Homebound movie : जाह्नवी कपूरचा ‘होमबाउंड’ ऑस्करसाठी निवडला गेला. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया नव्हता, पण त्याचं कुटुंब जाह्नवीला सपोर्ट करायला आलं होतं.
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूरचा नवा चित्रपट ‘होमबाउंड’ ऑस्करसाठी निवडला गेला आहे.
advertisement
2/7
या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये जाह्नवीने तिची आई श्रीदेवीची जुनी साडी नेसून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं; पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती तिच्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबासोबतच्या तिच्या वागणुकीची.
advertisement
3/7
जाह्नवीने ‘होमबाउंड’च्या स्क्रीनिंगसाठी श्रीदेवीची जुनी साडी घातली होती, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया नव्हता, पण त्याचं कुटुंब जाह्नवीला सपोर्ट करायला आलं होतं.
advertisement
4/7
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांची पत्नी उज्वला शिंदे आणि मुलगी स्मृती पहाडिया यांनी हजेरी लावली होती.
advertisement
5/7
जाह्नवीने उज्वला शिंदेना व्हीलचेअरवर पाहिलं, तेव्हा तिने लगेच त्यांच्या पायांना हात लावून आशीर्वाद घेतला. तिचा हा संस्कारी स्वभाव पाहून सगळेच प्रभावित झाले. जाह्नवीने उज्वला शिंदेंचा हात पकडला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.
advertisement
6/7
या सोहळ्यात शिखरची आई स्मृती पहाडियानेही त्यांच्या साडीतील रॉयल अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी मरून रंगाची सिल्क साडी घातली होती, ज्यामुळे त्यांचा लूक खूपच क्लासी दिसत होता.
advertisement
7/7
जाह्नवी आणि तिच्या होणाऱ्या सासूच्या कुटुंबातील हे प्रेम पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, “जाह्नवी खूप विनम्र आणि साधी आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Janhvi Kapoor : BF च्या आजीचे धरले पाय, आजीने दिली गोड पप्पी, सासरच्या मंडळींसोबत जान्हवी कपूरचे खास क्षण