ऐन दिवाळीत नोरा फतेहीने गुपचूप उरकलं लग्न? कोरियन सुपरस्टारसोबतचे हळदीचे फोटो व्हायरल, तुम्ही पाहिले का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nora Fatehi Secrete Wedding : डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या काही व्हायरल फोटोंनी सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, हे फोटो कोणत्याही साध्या पार्टीचे नसून, तिच्या हळदी समारंभाचे आहेत.
advertisement
1/9

मुंबई: संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या रोषणाईत न्हाऊन निघालेला असताना, बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या काही व्हायरल फोटोंनी सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
2/9
या फोटोंमध्ये नोरा चक्क एका कोरियन अभिनेता आणि गायक ली मिन हो याच्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, हे फोटो कोणत्याही साध्या पार्टीचे नसून, त्यांच्या हळदी समारंभाचे दिसत आहेत.
advertisement
3/9
नोरा फतेही आणि ली मिन हो यांचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. या फोटोंमध्ये नोरा पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये कोरियन अभिनेत्यासोबत पोझ देताना दिसत आहे.
advertisement
4/9
दोघांच्याही चेहऱ्यावर हळद लावलेली स्पष्ट दिसत आहे आणि नोराच्या हातावर मेहंदी देखील सजलेली आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी लगेचच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की, नोरा आणि ली मिन हो खरोखरच लग्न करत आहेत की हे केवळ एखाद्या शूटिंगचे फोटो आहेत?
advertisement
5/9
फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी थेट विचारले आहे की, "तुम्ही लग्न करत आहात का, मॅम?" तर अनेकांनी नोराच्या लग्नाची बातमी खरी नसावी, यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.
advertisement
6/9
काही युजर्सनी मात्र या फोटोंमागचे सत्य लगेचच ओळखले. एकाने लिहिले, "नोराच्या प्रत्येक फोटोतील ड्रेस आणि ज्वेलरी वेगवेगळी आहे." दुसऱ्याने तर थेट एआयचा उल्लेख करत लिहिले, "एआय... लग्न, घटस्फोट आणि वाढदिवसासाठी संपर्क साधा!"
advertisement
7/9
सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेले हे सगळे फोटो पूर्णपणे फेक आहेत, हे स्पष्ट झाले आहे. नोरा फतेहीच्या टीमकडून किंवा तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून अशा कोणत्याही लग्नाची किंवा हळदी समारंभाची माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
advertisement
8/9
हे फोटो एआय जनरेटेड किंवा मॉर्फ केलेले असण्याची शक्यता अधिक आहे, कारण ली मिन होचा चेहरा काही फोटोंमध्ये नोरासोबत जुळत नाहीये, असे चाहत्यांनी सांगितले.
advertisement
9/9
नोरा नुकतीच न्यूयॉर्कमध्ये दिवाळी पार्टीत दिसली होती, जिथे तिने प्रियंका चोप्राला भेटून गळाभेट घेतली होती. तसेच, आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'थामा' मधील तिचे 'दिलबर की आँखों का' हे नवीन गाणे सध्या प्रचंड हिट ठरले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐन दिवाळीत नोरा फतेहीने गुपचूप उरकलं लग्न? कोरियन सुपरस्टारसोबतचे हळदीचे फोटो व्हायरल, तुम्ही पाहिले का?