दीपिका-रणवीरने दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा, बाबाची कार्बन कॉपी आहे चिमुकली दुआ, इतकी गोड की राहालाही विसराल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Deepika-Ranveer Reveal Dua Face : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी दिवाळीच्या दिवशी दुआ पादुकोण सिंगचा पहिला फोटो शेअर केला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
advertisement
1/6

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या चाहत्यांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने सरप्राइज घेऊन आली! गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची सगळे वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे.
advertisement
2/6
दीपिका आणि रणवीर यांनी लाडकी लेक दुआ पादुकोण सिंग हिचा पहिला फोटो दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चाहत्यांसमोर आणला आहे. या फोटोने देशभरातील चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे.
advertisement
3/6
दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास कौटुंबिक क्षण सर्वांना त्यांच्या प्रेमात पाडणारे आहेत. या फोटोंमध्ये दीपिका लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे, तर तिने दुआला प्रेमाने आपल्या कुशीत घेतले आहे.
advertisement
4/6
चिमुकल्या दुआनेही लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला असून तिने तिच्या आईसोबत ट्विनिंग केलं आहे. दीपिका, रणवीर आणि दुआचे हे गोंडस फॅमिली फोटो सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनले आहेत.
advertisement
5/6
दुसरीकडे, आपल्या उत्साही व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग एका क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये, दीपिका आणि दुआ या दोघींना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. हे सुंदर फोटो शेअर करताना या त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
6/6
२०१८ मध्ये लग्न केलेल्या दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात गेल्या वर्षी दुआचे आगमन झाले, पण त्यांनी आजपर्यंत तिला माध्यमांपासून दूर ठेवले होते. यंदाच्या दिवाळीला त्यांनी आपल्या परीचा चेहरा सर्वांना दाखवत, त्यांच्या चाहत्यांना एक प्रकारे सरप्राइज दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिका-रणवीरने दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा, बाबाची कार्बन कॉपी आहे चिमुकली दुआ, इतकी गोड की राहालाही विसराल